नांदेड| महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाच्या आधारावर राज्य सरकारने शासन आपल्या दारी हे अभियान सुरू केले आहे. पण ही संकल्पना भारतीय संविधानातच अंतर्भूत असून देशातील शेवटच्या नागरिकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. या सरकारने राजकारण करण्यातच वेळ न घालवता बाबासाहेबांच्या तत्वावधानावर चालणारे हे अभियान गांभिर्याने राबविल्यास राज्याला विकासाची दिशा मिळेल असे प्रतिपादन येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी केले. ते जवळ्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, माधव पावडे, पुरभाजी गोडबोले, माधवदादा गोडबोले, पांडूरंग गच्चे, बालाजी झिंझाडे, किशन गोडबोले, प्रताप गच्चे, हरिदास पांचाळ, गंगाधर शिखरे, समता सैनिक दलाचे रमेश गोडबोले, आनंदा गोडबोले, सुरेश गोडबोले, रवि गच्चे, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनिषा गच्चे, हैदर शेख यांची उपस्थिती होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प व धूप पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विषय शिक्षक तथा शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप किशन गच्चे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष घटकार यांनी केले. आभार शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी मानले.