नांदेड| परिक्षेत्रातील परिक्षेत्रीय स्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. सन 2023-24 करिता मानव अधिकार जनजागृती पित्यर्थ वादविवाद स्पर्धा दिनांक 06.12.2023 रोजी बुधवार या दिवशी मंथन हॉल पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे घेण्यात आली. सदर वादविवाद स्पर्धेचा विषय होता ” सामान्य नागरीकांशी संबंध ठेवतांना पोलीसांकडुन त्यांच्या मानव अधिकाराचे उल्लंघन का होते. त्याचे परिनाम कशा प्रकारे कमी करू शकतो.” सदर स्पर्धेमध्ये एकुण सहा स्पर्धकांनी भाग घेतला होता.
1. सपोउपनि श्री विठ्ठल एकनाथराव कत्ते, पो.मु. नांदेड 2. पोकों बालाजी कळकेकर, पोस्टे लिंवगाव, जि. नांदेड 3. पोहेकॉ श्री मंगेश भरत मुळे, पोस्टे शिवाजीनगर लातुर 4. पोहेकॉ श्री परमेश्वर बाबुराव अंभगे, वाचक शाखा पो. अ. का. लातुर, 5. पोना श्री अजय अ. पंडीत, पोस्टे वसमत ग्रामीण 6. मपोना श्रीमती विजया कुलकर्णी, जिवीशा हिंगोली यांनी आपापले विचार मांडले. सदर स्पर्धेचे परिक्षक म्हणुन 1. साईनाथ नागोराव कांडले 2. दत्ता नागोराव बारसे, दोघे महात्मा फुले हायस्कुल बाबानगर नांदेड यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी गृह पोलीस उप-अधिक्षक मा. श्री जगदीश भंडरवार, यांचे उपस्थितीत पार पडली.
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मपोना श्रीमती विजया कुलकर्णी, जिवीशा हिंगोली तर द्वितीय क्रमांक सपोउपनि श्री विठ्ठल एकनाथराव कत्ते, पो.मु. नांदेड, तृतीय क्रमांक पोना श्री अजय अ. पंडीत, पोस्टे वसमत ग्रामीण जि. हिंगोली यांनी पटकावला. प्रथम व द्वितीय आलेल्या स्पर्धकांना मुंबई येथे होणान्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत भाग घेणार आहेत. विजेत्या स्पर्धकांचे मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री जगदीश भंडरवार, प्र. गृह पोलीस उप-अधिक्षक नांदेड यांनी अभिनंदन केले. पुढील स्पर्धे करीता शुभेच्छा दिल्या.