हंडरगुळी/उदगीर/लातूर,विठ्ठल पाटील। सध्या सगळीकडे ऊसाच्या कारखाण्याचे बाॅयलर पेटल्याने ऊस वाहतुकीसाठी ट्रक=ट्रॅक्टर यांचा सर्व कारखानदार वापर करतात.माञ या मार्गे तोंडार व अहमदपुर येथील सा. कारखाण्यास ऊस नेणा-या अनेक ट्रॅक्टर मध्ये लहान,मोठे साऊॅंड लावुन जोरात गाणे वाजवत चालक मंडळी जोशात ट्रॅक्टर चालवतात.
यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पण या वाहणांवर आजवर हळी भागात कुणीच कारवाही केली नाही. R.t.O.पण याकडे जाणुन-बुजुन नव्हे तर “अर्थपुर्ण” दुर्लक्ष करत असावेत. अशी कुजबूज जनतेतून ऐकू येते. कांही दिवसापुर्वी i.p.s (.सिंघम ) पोलीस अधिकारी श्री.निकेतनजी कदम यांनी अशा ट्रॅक्टरवर रितसर कारवाही केली होती.पण नुकतीच त्यांंची बदली झाल्याने आता अशा ट्रॅक्टरवर कारवाही करायचे धाडस दाखविणार कोण?असा प्रश्न हाळी हंडरगुळीकरांतुन चर्चीला जातोय.