नांदेडमहाराष्ट्र

एक हजार कंत्राटी डॉक्टर्स अधिकारी कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

नांदेड| राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत नांदेड जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कंत्राटी डॉक्टर्स , अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे म्हणून एक हजारच्या वर कंत्राटी डॉक्टर्स अधिकारी कर्मचारी यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला .तेथे समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मागण्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहोचते करण्याची विनंती करण्यात आली .

महात्मा फुले पुतळा आयटीआय पासून शिवाजीनगर कलामंदिर शिवाजी पुतळा मार्गे सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड असे मार्गक्रमण करीत अधिकारी व कर्मचारी शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे म्हणून परिसर दणानून सोडला होता . मागील वीस वर्षापासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी सेवा देत असून इतर पाच राज्यात अशाच प्रकारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात आले असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .

२५ ऑक्टोबर २०२३ पासून नांदेड जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर समायोजन कृती समिती तर्फे बेमुदत धरणे आंदोलन चालू असून त्याचाच भाग म्हणून तसेच ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी समायोजन कृती समितीच्या आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलनास भेट देऊन समायोजनाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे अभिवचन देऊनही अद्याप साध्या चर्चेसाठी सुद्धा बोलवले नाही या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सदर मोर्चा संपन्न झाला .

सदर मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजय देशमुख ,समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रकाश मारावार ,सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव अनिरुद्ध भावसार ,जिल्हा समूह संघटक सिद्धार्थ थोरात ,आयटक कंत्राटी नर्सेस युनियनच्या कार्याध्यक्षा श्रीमती रेखा टर्के ,समन्वयक अफरोज सौदागर , गंगाधर कोंके ,प्रदीप देशमुख ,प्रसाद कुलकर्णी ,नलिनी वडे सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अधिकारी व कर्मचारी ,कुष्ठरोग तंत्रज्ञ संघटनेचे अध्यक्ष संतोष डोंगरे , आयुष आरोग्य अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ अमोल भंडारे ,मनपा येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आरबीएसके संघटना ,राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ कास्ट्राईब संघटना ,राष्ट्रीय आरोग्य अभियान लेखापाल संघटना महाराष्ट्र राज्य कंत्राटी औषध निर्माण कृती समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोर्चात भव्य स्वरूपाने सहभागी होऊन आपला आक्रोष व्यक्त केला .तसेच शासनाने लवकरात लवकर शासकीय समययोजना बाबतचा निर्णय न घेतल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्धार अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केले .

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!