हिमायतनगर। काल संपन्न झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. ग्रामसभेत ओबीसीला 30 घरकुल मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. सवना ते चिचोंर्डी रोड पादण रस्ता व सवना ते बार्हाळी तांडा रोड पांदण रस्ता ग्रामसभेत ठराव पारित करण्यात आला. गावात शिवजयंती, भीम जयंती, दुर्गादेवी आदी मिरवणूक मुख्य रस्त्यावरुन ट्रक्टर ही फिरत नाही. गल्ली बोळात बैलगाडीही जाणे अवघड आहे. सन 1990 च्या रेकाॅर्डनुसार जूण्या नमूना नं. 8 नुसार घरे ठेवून झालेले अतिक्रमण काढण्यात यावे. असे निवेदन ग्रामसेवक कोंडामंगल यांना परमेश्वर संगनवाड सह 15/16 लोकांनी दिले आहे. 26 जानेवारी पर्यत अतिक्रमण काढले नाही तर ग्रामपंचायती समोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे.
तालुक्यातील मौजे सवना ज. येथे ग्रामसभा दि.21 नोव्हेंबरला सरपंच परमेश्वर गोपतवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ग्रामसेवक कोंडामंगल, सदस्य गजानन गोपेवाड, संदीप बिरकलवार , रमाबाई राऊत,सोनबा राऊत, गणेशराव भूसाळे, राजू जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष कैलास अनगुलवार, गजानन आलेवाड, सोनबा अनगुलवार , परमेश्वर संगनवाड,विजय गायकवाड, शिद्धार्थ राऊत बाळू धबडगे, अशोक राऊत, आदीसह तरुण,महिला, जेष्ठ नागरिक हजर होते. सवना ज. येथील शेतकर्यांना शेतीला जाण्यासाठी पांदण रस्ते हवे आहेत. मारोती मंदीर ते चिंचोर्डी रोड पांदण रस्ता मंजूरी व सवना रोड ते कोटराई मार्गे बार्हाळीतांडा पांदण रस्ता मंजूरी मिळाली आहे.
टेंभी रस्ता ते कोटलिंग पांदण रस्ता आणि पाचशिव महादेव रोड ते पिचोंडी पांदण रस्ता झाल्यास गावची रस्त्याची समश्या सुटणार आहे. टप्या टप्याने ही कामे करावीत अशी गावकर्याची मागणी आहे. गावासाठी पांदण रस्ता होत असेल तर कोणीही अडथळा आणू नये. शासन मातोश्री पांदण रस्ता मंजूरी देत आहे. सवना ज. येथे संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून मतासाठी अतिक्रमण काढले जात नाही अशी सुज्ञ लोकांची ओरड आहे. गल्ली बोळातही अतिक्रमण झाल्याने बैलगाडी ही घरा पर्यत जात नाही. भावीपिढीसाठी अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे करणे गरजेचे आहे. त्या संदर्भात अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामसभेतच परमेश्वर संगनवाड , कैलास अनगुलवार, गणेशराव भूसाळे, विक्राम गोपेवाड, सोनबा अनगुलवार, बंडू अनगुलवार, भारत गटकपवाड.किशनराव बुटनवाड, रामदास फेदेवाड, राजेश्वर गोपेवाड, भगवान कर्हाळे, दिवाकर पुठ्ठेवाड आदीसह 16 नागरिकाच्या सह्याने गावकर्यांनी निवेदन दिले आहे.
सवना ज. येथील अतिक्रमण काढून वृक्ष लागवड करावयाची आहे. मुख्यरस्त्यासह गल्ली बोळातील ही अतिक्रमण काढणार आहोत. ग्रामसभेत अतिक्रमण काढण्यासाठीचा तक्रार अर्ज गावकर्याचा आला आहे. त्यानूसार ठराव घेवून अतिक्रमण हटविले जाणार आहे असे सांगीतले. ओबीसी साठी 30 घरकुल मंजूर झाले आहेत असे ही सांगीतले आहे.