पोखरभोसी येथे सोमवारी बुध्द मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन
उस्माननगर। पोखरभोसी ता.लोहा येथे दि.२७ नोव्हेंबर सोमवारी सकाळी साडेसात वाजता बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक काढून साडेनऊ वाजता तक्षशिला बुद्ध विहार पोखरभोसी ता. लोहा येथे भव्य बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २७ नोव्हेंबर रोज सोमवारी सकाळी साडेसात वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण त्यानंतर आठ वाजता बुद्धमूर्तीची भव्य मिरवणूक शुभ्र वस्त्र परिधान करून गावातील मुख्य रस्त्याने पूज्यभदन्त विनयप्रियबोधी महास्थवीर व पूज्य भदन्त रेवतबोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा धम्ममय वातावरणात उत्साहात पार पडणार आहे. त्यानंतर उपस्थित पुज्य भदन्त यांच्या धम्मदेशना होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.पी.एम. वाघमारे ( भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष दक्षिण नांदेड ) तर याप्रसंगी उपस्थित भीम अनुयायी व श्रद्धावान उपासक , उपासिकांना खीरदान करण्यात येणार आहे.
त्यानंतर अकरा वाजता धम्मपिठावर मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. रवि. एन. सरोदे ( उप कुलसचिव तथा माजी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ , स्वा. रा.ती. म. वि. नांदेड ) ॲड. विजय गोणारकर ( विचारवंत , विधितज्ञ , जिल्हा व सत्रन्यायालय नांदेड ) , थोरात ( उपविभागीय पोलीस उपअधीक्षक पोलीस स्टेशन कंधार ) , ओमकार चिंचवळकर ( पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लोहा ) , मारुती सोनकांबळे ( पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन लोहा ) , शिवा भाऊ नरंगले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नांदेड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपासक उपस्थित राहणार आहेत .
रात्री ठीक आठ वाजता भीमगिताचा सामाना आयोजित करण्यात आला ,असून यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका आशाताई चरवे ( चिखली ) बुलढाणा व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक झी युवा फेम रविराज भद्रे मुखेड यांच्या प्रबोधनात्मक बुद्ध भीम भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भीम अनुयायांनी मोठ्या संख्येने हजर राहून बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोळ्याची शोभा वाढवावी असे आवाहान समस्त गावकरी मंडळी व उपा. केशव कांबळे ,उपा. दिलीप कांबळे ,उपा. गौतम कांबळे ,सर्व पोखरभोसी ता.लोहा यांनी केले आहे.