नांदेडमनोरंजन

62 व्या महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्य स्पर्धेला प्रारंभ ज्येष्ठ रंगकर्मी राजीव किवळीकर यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची गौरव संपन्न 62 वी महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्य स्पर्धा आज दिनांक 21 नोव्हेंबर 2023 पासून मोठ्या उत्साहात सुरू झाली. कुसुम सभागृह येथे आयोजीत या नाट्य स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, ज्येष्ठ रंगकर्मी राजीव किवळीकर, ललित व कलाजीवी संकुलचे विभाग प्रमुख प्रा. डॉ पृथ्वीराज तौर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मण संगेवार, अपर्णा नेरळकर, निलीमा चितळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

रोज सायंकाळी सात वाजता ही नाटके होणार सादर
नांदेड येथे या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये पुढील नाटके सादर होणार आहेत. यात दिनांक 21 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेड यांच्यावतीने वसंत कानेटकर लिखीत रायगडाला जेंव्हा जाग येते हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी आंबेडकरवादी मंच नांदेड यांच्यावतीने वीरेंद्र गणवीर लिखीत गटार हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन राहुल दि. जोंधळे यांनी केले आहे. गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी छत्रपती सेवाभावी संस्था परभणी यांच्यावतीने अतुल साळवे लिखीत वाडा हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन दिनेश कदम यांनी केले आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी कल्चरल असोसिएशन नांदेड यांच्यावतीने अशोक बुरबुरे लिखीत मयतीम्होर्ल अग्टं हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. विजयकुमार माहुरे यांनी केले आहे. शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी देऊबाई शिक्षण प्रसारक मंडळ वाघी नांदेड यांच्यावतीने डॉ. सतीश साळुंके लिखीत महात्मा कांबळे हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. राम चव्हाण यांनी केले आहे.

रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट परभणी यांच्यावतीने रविशंकर झिंगरे लिखीत गंमत असते नात्याची हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन विजय करभाजन यांनी केले आहे.
सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सिद्ध नागार्जुना मेडिकल असोशिएशन नांदेड यांच्यावतीने इरफान मुजावर लिखीत नेकी हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन रागेश्री जोशी यांनी केले आहे. मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस आर्टस, कॉमर्स अण्ड सायन्स कॉलेज नांदेड यांच्यावतीने सुरेश खरे लिखीत मंतरलेली चैत्रवेल हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन सुरेश खरे यांनी केले आहे.

बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी राजीव गांधी युवा फोरम परभणी यांच्यावतीने अतुल साळवे लिखीत दि अनॉनिमस हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अतुल साळवे यांनी केले आहे. गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा, युवक मंडळ परभणी यांच्यावतीने रविशंकर झिंगरे लिखीत खंडहर हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन सुनील ढवळे यांनी केले आहे.शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर रोजी तन्मय ग्रुप नांदेड यांच्यावतीने नाथा चितळे लिखीत कथा मुक्तीच्या व्यथा मातीच्या हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन नाथा चितळे यांनी केले आहे.

शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी झपूर्झा सोशल फाउंडेशन परभणी यांच्यावतीने विनोद डावरे लिखीत चिरंजीवी हे नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन ऐश्वर्या डावरे यांनी केले आहे. नांदेडकर रसिकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन या स्पर्धेचे समन्वयक दिनेश कवडे यांनी केले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!