हिमायतनगर। सोनारी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील रोहित जळाली आहेत तर काही ठिकाणचे जळालेली रोहित्र महावितरणने जमा करून घेऊन देखील अद्यापही शेतकऱ्यांना बसवून दिले नाहीत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत याकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना अभियंत्यांना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केल्या आहेत.
सोनारी येथील शेतकऱ्यांनी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची रविवारी जवळगाव येथे भेट घेतली आहे. सरसम विद्युत केंद्रा अंतर्गत सोनारी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील रोहित्र जळाली आहेत. तर काही ठिकाणचे बंद रोहित्र महावितरण कंपनीकडे जमा केली आहेत.
परंतु जमा केलेली रोहित्र शेतकऱ्यांना बसवून देण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांनी आ. जवळगावकर यांच्याकडे सागीतले असता. आ. जवळगावकर यांनी महावितरण कंपनीच्या अभियंता, उपअभियंता यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील रोहित्र तात्काळ दुरुस्त करून बसवून शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशा सुचना दिल्या आहेत. यावेळी सोनारी येथील श्रीदत्त पाटील, दिगांबर पाटील,बाबाराव माने ,चांदराव पवार, मधुकर पवार, अमोल पवार ,मनोज पवार ,प्रदिप पवार, वैभव पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.