क्राईमनांदेड

पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमध्ये 7.62 MM OFV-78-M-80 असे लिहीलेले 436 राऊंन्ड (काडतुस) सापडले

नांदेड। पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमध्ये 7.62 MM OFV-78-M-80 असे लिहीलेले 436 राऊंन्ड (काडतुस) मिळुन आले आहे, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक, दहशतवादी विरोधी पथक, डॉग स्कॉड, बि.डी.डी.एस.पथक पोचले असून, चौकशी सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक 01.06.2024 रोजी रात्री 20.00 वाजताचे सुमारास पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक विनोद देशमुख व सोबत पोहेकॉ/1098 गजानन किडे, पोहेकॉ/818 प्रदिप गर्दनमारे, पोहेकॉ/709 राठोड, पोहेकॉ/2316 कळके, पोकॉ/ 710 ओमप्रकाश कवडे, पोकॉ/516 हनवता कदम व पोकॉ/157 कदम असे हदीमध्ये पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, मौजे पावडेवाडी शिवारातील राहणारा आकाश रामराव पावडे वय 24 वर्षे हा पावडेवाडी शिवारातील नाल्या मधील झाडाझुडपामध्ये मध काढण्यासाठी गेला असता त्याला नाल्यामध्ये राऊंन्ड (काडतुस) दिसुन आले. सदरची माहीती प्राप्त होताच तात्काळ पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे पोलीस स्टेशन भाग्यनगर व वरील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार असे सदर ठिकाणी आकाश रामराव पावडे याचेसह जावुन पाहणी केली.

पावडेवाडी शिवारातील नाल्यामध्ये 436 राऊन्ड (काडतुस) नाल्याच्या मातीमध्ये अर्धवट उघडे पडलेले व गंजुन जीर्ण झालेल्या अवस्थेत मिळुन आलेले आहेत. सदर राऊंन्ड (काडतुस) ताब्यात घेतले. सदर राऊंन्डवर पाठीमागील फायर कॅपवर 7.62 OFV-78-M-80-असे कोरीव लिहीलेले आहे. त्या बाबत पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार शाखेतील अमंलदार यांचे मार्फतीने तपासणी केली असता सदरील राऊंन्ड हे 1978 मध्ये (46 वर्षापुर्वी) बनवले असुन ते गंजुन जीर्ण होवुन निकामी झालेले आहेत असे प्रथम दर्शनी दिसुन येत आहे.

सदर घटनास्थळी श्रीकृष्ण कोकाटे साहेब, पोलीस अधिक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, श्रीमती किरितीका सी.एम. मॅडम, सहायक पोलीस अधिक्षक, उपविभाग, नांदेड शहर, नांदेड, पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, दहशतवादी विरोधी पथक नांदेड, डॉग स्कॉड, नांदेड, बि.डी.डी.एस.पथक नांदेड यांनी भेट देवुन पाहणी केली आहे. सदर घटनेबाबत अधिक चौकशी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हे करीत आहेत.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!