धर्म-अध्यात्मनांदेड

१५०० रामभक्तांचा समूह आयोध्येत दर्शनासाठी दाखल; दुपारी होणार दर्शन

नांदेड। नांदेड येथून दि.14 फेब्रुवारी 2024 पहाटे ४ वा. जय श्रीरामाच्या जयघोषात १५०० रामभक्तांचा समूह आयोध्येला रवाना झाला होता. या रामभक्तांचे आगमन अयोध्येत झाले असून, त्या सर्वांच प्रभू श्रीराम दर्शन दि.१५ रोजी दुपारी होणार असून, डोळ्याचे पारणे फिरणार आहेत.

आयोध्यत २२ जानेवारी रोजी भव्य प्रमाणात शहरापासून खेड्यांपर्यंत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर आता दररोज हजारो रामभक्त आयोध्येला रवाना होत आहेत. संघ रचनेतून देवगिरी प्रांतातील सातही जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वय संघ, विश्व हिंदू परिषद, जागरण गट व अन्य संलग्न संस्थाचे रामभक्त कार्यकर्ते आस्था स्पेशल ट्रेनने आज निघाले आहेत, यात जवळपास १५०० कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.

दिवसभर रामनामाचा जप व जयघोष करण्यात येत असून सायंकाळी हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र घेतल्या जाते. यात महिला, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामुळे रेल्वे मध्ये सुद्धा राममय वातावरण निर्माण झाले आहे. राम नामाच्या जयघोषाने रेल्वे दुमदुमून जात आहे. सर्वांना श्रीराम चरणांची ओढ लागली असून आयोध्येला कधी पोहचू असे झाले आहे.रेल्वे स्टेशन नांदेड येथे आयोध्या ला राम भक्तांना पाठवण्या साठी रेल्वेटेंशन नांदेड च्या वतीने भवे दिवे स्वरूपात स्वागतकरण्यात आले आहे.

श्री प्रभू राम जन्मभूमी आयोध्या येथुन आमंत्रित असणार्या राम भक्तांना नांदेड येथुन अयोध्येला नीगालेलया राम भक्तांचे स्वागत रेल्वे विभाग नांदेड च्या वतीने करण्यात आले आहे.या यावेळी जिल्हा संघचालक सुभाष शिंदे, जागरण गट जिल्हाप्रमुख पत्रकार शिवाजीराव कोनापुरे, विश्वानात आणा दाचावर, संग चालक बिलोली,सत्यवान गरुडकर,अयोध्या यात्रा प्रवास प्रमुख कृष्णाजी पोलावार,अशोक चवदरी मुखेड तालुका संग चालक,नायगाव तालुका कार्यवाह मनमत कस्तुरे,डाँ. सुदाकर रेडी,गादेवार सावकार, नायगाव तालुका गट प्रमुख पत्रकार गणेश पा. कंदुरके अनिरुद्ध देशमुख, बिलोली तालुका कार्यवाह माधव ठक्करवाड, शिवप्रसाद तोटावाड, वरील सर्वजण आयोध्या या ठिकाणी पोहोचले आहेत

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!