नांदेडराजकिय

जिंदमनगर गोपाळचावाडी मुख्य रस्त्यासाठी ३० लक्ष रूपये – खा.चिखलीकर

नवीन नांदेड। गोपाळचावाडी ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत असलेल्या मुख्य रस्ता ते जिंदमनगर भागात ३० लक्ष रूपये देण्याची घोषणा करून हे काम दिवाळी पुर्वी सुरू होणार असल्याचे सांगितले, या वेळी नवरात्र महोत्सव निमित्ताने जिंदमनगर येथील त्रिमुत्री नवदुर्गा महोत्सव मंडळ येथील महाआरती करण्यात आली.

जिंदमनगर गोपाळचावडी येथे नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते त्रिमूर्ती दुर्गा माता मंडळ व भीमाशंकर दुर्गा माता मंडळाची आरती संपन्न झाली, यावेळी माजी नगरसेवक संदीप पाटील चिखलीकर,संजय पाटील घोगरे, किशोर यादव,बालासाहेब मोरे, संदीप पावडे,गजानन कत्ते,शिवानंद नीलावार,सौ.ललिता डेरनासे यांच्या सह मंडळ पदाधिकारी,नागरीक ग्रामस्थ उपस्थिती होती.

आरतीचे आयोजक भाजपा जिल्हा प्रवक्ता धीरज स्वामी यांनी खासदारांसह इतर सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार सन्मान केला, धीरज स्वामी यांनी खासदारांना केलेली रस्त्याची मागणी तात्काळ मंजूर करून 30 लाखाचा निधी देण्याची घोषणा करुन खासदारांनी जिंदमनगरातील नागरिकांची मुख्य अडचण दुर केल्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन आभार मानले,भीमाशंकर सोसायटी गोपाळचावडी येथील नागरिकांनी पाण्याच्या नळासंबंधी केलेल्या मागणी संदर्भात लवकरच काम पुर्ण करण्यासाठी संबंधिताला सूचना करण्याचे आश्वासनं दिले.

आरतीसाठी जिंदमनगरातील असंख्य महिला पुरुष माता भक्त उपस्थीत होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रम्हानंद माने, दुर्गा ठाकुर,पांडुरंग पुजरवाड , बापूराव पदरे, संभाजी पुरी,विष्णू शिंदे, आचमारे,रामराव भुरे,चंद्रकांत नागठाणे,अनिल उबाळे,विठ्ल वारकड, कैलास वाघमारे,अनिल शिंदे, निलेश कुलकर्णी,सोनू पांचाळ, शिवाजी पुयड ,अशोक बामणे, लहू शिंदे,विलास कारामुंगे यांच्या सह उपस्थित नागरीकांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!