नांदेडमहाराष्ट्र

26 वीं स्व. बंसीलाल काबरा व्याख्यानमाला सम्पन्न व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी सुसंस्कार घडवणारी व्याख्यानमाला – प्रा डॉ जगदीश कदम

नांदेड। स्व. बंसीलालजी काबरा आयकर विक्रीकर व्याख्यानमाला सर्वघटकांसाठी उपयोगी असून विशेषतः गेली 26 वर्षें या द्वारे शैक्षणिक आणि वाणिज्य क्षेत्राला लाभ मिळत आहे. वर्तमान परिस्थितीत व्यापारी वर्ग, करदाता टैक्सेशन अभ्यासक्रमातिल विद्यार्थ्यांसाठी सुसंस्कार घडावी अशी ही व्याख्यानमाला आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक आणि गंगापुर येथे आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ जगदीश कदम यांनी केले.

रविवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी हॉटेल चंद्रलोक येथे स्व. बंसीलालजी काबरा व्याख्यानमालेचे उदघाटन प्रा. डॉ जगदीश कदम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुंबई येथील संघटनेचे अध्यक्ष श्री प्रवीण शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून आणि सीए असित शहा मुंबई, सीए शुभम राठी औरंगाबाद, सीए पवन मुंदडा नांदेड यांची प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थिती होती. तसेच कार्यक्रम व्यासपीठावर काबरा कुटुंबियाचे ज्येष्ठ छ. संभाजीनगर निवासी ओमप्रकाशजी काबरा, सीए संघटनेचे अध्यक्ष गोविन्द बिडवई, कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष गंगाबिशन कांकर यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती.

प्रा. जगदीश कदम आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, नांदेड सारख्या शहरात गेली 26 वर्षें व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक आणि बौद्धिक प्रबोधन करण्याचे उपक्रम सुरु आहे. आज स्व. बंसीलालजी काबरा यांचे स्मरण करतांना त्यांचे एक मोठे आदर्श डोळ्यापुढे आहे. कर सल्लागार म्हणून त्यांनी प्रामाणिक सेवा दिली. अडचणीच्या वेळी त्यांनी स्वतःचे क्लाइंट असो की व्यापारी किंवा विद्यार्थी, त्यांना तांत्रिकदृष्टया काय बरोबर आहे ते मार्गदर्शन केले. त्यांनी घडवलेले सीए आणि टॅक्स कन्सल्टन्ट आज नावोलौकिक करीत आहेत. माझ्या सारख्या साहित्य क्षेत्रातील एका व्यक्तीस या व्याख्यान मालेचे उद्घाटक म्हणून आमंत्रण दिले गेले हे पण व्याख्यानमाला आयोजन समितिने दाखविलेले औदार्य आहे. येथे येऊन एका नव्या क्षेत्रातील मान्यवरांशी भेट झाली. व्याख्यानमाला समिती व काबरा कुटुंबियानी आज दिलेले सत्कार दीर्घकाळ स्मरणात राहील असे ही ते म्हणाले.

व्याख्यानमालेचे 26 वें पुष्प गूंफतांना सीए असित शहा मुंबई यांनी जीएसटी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. एडवोकेट शुभम राठी छ. संभाजीनगर यांनी आयकर विषयावर मार्गदर्शन केले. सीए पवन मुंदडा नांदेड यांनी बँक ऋण प्रणाली विषयाचे मार्गदर्शन आपल्या व्याख्यानाच्या माध्यमेतुन केले.

व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात व्याख्यानमाला आयोजनाचे कौतुक केले. ते म्हणाले, नांदेड शहरात व्याख्यानमालेने एक परंपरा सुरु केली आहे ज्याची तुलना महाराष्ट्रातील इतर कोणत्याही विषयावरील व्याख्यानमाला कार्यक्रमाशी होऊ शकत नाही. ही परंपरा भविष्यात पिढ्यान पिढ्या सुरु राहावी ही सदिच्छा.

कार्यक्रमात सीए क्षेत्रातील प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व हर्षदभाई शहा यांचे सहपत्नी आणि परभणी येथील कर सल्लागार जगदीश मुंदडा यांचे सहपत्नी सत्कार करण्यात आले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत डीटीएल विषयात गुणवंत ठरलेले विद्यार्थी प्रथम सुजाता गवळी नांदेड , द्वितीय राधेश्याम येमुल नांदेड आणि तृतीय अपूर्वा पिंपळनेरकर लातूर यांचा सह कुटुंब सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रस्ताविक सीए प्रतीक काबरा यांनी केले. तर सूत्रसंचालन सीए नीलम भट्टड आणि सीए सोनल सारडा यांनी केले. आयोजन समिति च्या सर्व सदस्यांनी व्याख्यानमालेच्या सफलतेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमात मोठ्या संख्येत डीटीएलचे विद्यार्थी आणि व्यापारी कर सल्लागार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!