नांदेड। पो.स्टे शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी 24 ग्रॅम सोन्याचे गंठन, व एक बजाज कंपनीची पल्सर मोटास सायकल असा एकुण 2,05,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कार्यवाहिचं सर्वसामान्य नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे.
दिनांक. 30/01/2024 रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्र 39/2024 कलम 392,34 भादंवि चा गुन्हा दाखल होता, श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, मा. पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार साहेब अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री सुशीलकुमार नायक साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड शहर, यांनी नांदेड शहरातील चैन स्नॅचींग संवधाने कडक कार्यवाही करुन गुन्हे उघडकिस आनण्याचे आदेशीत केल्याने श्री जालींगदर तांदळे, पोलीस निरीक्षक, पो.स्टे शिवाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, व अमलदार यांना मिळालेल्या गोपनिय माहिती मिळाली.
त्या आधारे गुन्ह्यातील आरोपी क्र. 1) नामे प्रेमसिंग धरमसींग रामगडीया वय 23 वर्ष,रा. शिखारघाट ता. मुदखेड जि. नांदेड यास दिनांक. 01.02.2024 रोजी ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात वापलेली बजाज कंपनीची पल्सर 220 मोटार सायकल कि.अं. 80,000 रु जप्त करुन आरोपीकडे सखोल चौकशी करुन गुन्ह्यातील गेला माल व त्याचे साथीदार यांच्या बाबत विचारपुस केले असता त्याने गुन्ह्यातील आरोपी क्र 2) राजेश संजय चंदनशीवे, क्र. 3) मनोज सुर्यकांत जोगदंड असे सांगीतले. आरोपी क्र 2 व 3 यांचा शोध घेवुन त्यांना ताव्यात घेवुन गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल 24 ग्रॅम सोन्याचे गंठण कि.अं. 1,25,000 रुपये चे हस्तगत केले असा एकुण 2,05,000 रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांनी काढुन दिल्याने सदर मुद्देमाल जप्त करुन उत्कृष्ट कामगीरी केली.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक नांदेड मा.श्री अबिनाश कुमार, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशीलकुमार नायक पोलीस निरीक्षक जालींदर तांदळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक मिलींद सोनकांबळे व पोहेकॉ रविशंकर बामणे, पोकॉ/ देवसिंग सिंगल, शेख अझरोद्दीन, दत्ता वडजे, राहुल लाठकर लिंबाजी राठोड व सायबर सेल चे पोहेकों राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली.