नांदेडराजकिय

नांदेड लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात; 43 उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

नांदेड| 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍या छाननीमध्‍ये पात्र ६६ उमेदवारापैकी एकूण 43 उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 23 उमेदवार सध्या पात्र आहे. 16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्‍ये 23 अंतिम उमेदवार निश्चित झाले आहेत. उमेदवारांची नावे व पक्ष चिन्‍ह पुढीलप्रमाणे असल्‍याची माहिती मुख्‍य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

अर्ज परत घेण्‍याच्‍या शेवटच्‍या दिवशी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन रिंगणात असलेल्‍या उमेदवारांची माहिती दिली. जिल्‍ह्यामध्‍ये २६ एप्रिल २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मोठ्यासंख्‍येने जनतेने लोकशाहीच्‍या या महोत्‍सवात आपल्‍या मतदाधिकाराचे कर्तव्‍य म्‍हणून कार्यवहन करावे, असे आवाहन जिल्‍हाधिका-यांनी केले. यावेळी जिल्‍ह्यातील कायदा, सुव्‍यवस्‍था, आदर्श आचारसंहिता तसेच १६ मार्च पासून वेगवेगळ्या विभागात झालेली कार्यवाही तसेच निवडणुकीची तयारी याबाबतची माहिती दिली.

आज एकूण 66 पात्र उमेदवारापैकी आज 43 जणांनी माघार घेतली त्‍यामूळे 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्‍ये चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी)- चिन्‍ह कमळ, पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी) चिन्‍ह- हत्‍ती, चव्हाण वसंतराव बळवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) चिन्‍ह- हात, अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी) चिन्‍ह-शाळेचे दप्‍तर, अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी) चिन्‍ह-शिट्टी , कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग) चिन्‍ह-शिवण यंत्र, राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी) चिन्‍ह-खाट, रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) चिन्‍ह-ऑटो रिक्‍शा, सुशीला निळकंठराव पवार (समनक जनता पार्टी) चिन्‍ह-गॅस सिलेंडर, हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) चिन्‍ह-जहाज. तर अपक्षांमध्‍ये कदम सुरज देवेंद्र (अपक्ष) चिन्‍ह-फुगा, कल्पना संजय गायकवाड (अपक्ष) चिन्‍ह-माईक, गजानन दत्तरामजी धुमाळ (अपक्ष) चिन्‍ह-कपाट, जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष) चिन्‍ह-टेबल, देविदास गोविंदराव इंगळे (अपक्ष) चिन्‍ह-ऊस शेतकरी, नागेश संभाजी गायकवाड (अपक्ष) चिन्‍ह-एअर कंडिशनर, निखिल लक्ष्मणराव गर्जे (अपक्ष) चिन्‍ह-हिरा, भास्कर चंपतराव डोईफोडे (अपक्ष) चिन्‍ह-सफरचंद, महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष) चिन्‍ह–पेन ड्राईव्‍ह, राठोड सुरेश गोपीनाथ (अपक्ष) चिन्‍ह-रोड रोलर, लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष) चिन्‍ह-बेबी वॉकर, साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष) चिन्‍ह-पेनाची निब सात किरणांसह, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे (अपक्ष) चिन्‍ह-बांगड्या यांचा समावेश आहे.

माघार घेतलेले उमेदवार- मोहनराव आनंदराव वाघमारे, शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलीस- ए-इन्कलाब –ए- मिल्लत), सय्यद तनवीर (बहुजन महापार्टी), अकबर अख्‍तर खॉन, अक्रम रहेमान सय्यद, अनवर अ. कादर अ. कादर शेख, अमजत खा सरवर खान, अरुण भागाजी साबळे, अशफाक अहमद, असलम इब्राहीम शेख, शे. इमरान शे. पाशा, इरफान फहरुख सईद, मो. इलियास अब्दुल वहिद मोहमद, खान अलायार युसुफ खान, अ. खालेद अ. रफीक, जफर अली खाँ महेमुद अली खाँ पठाण, जुल्फेखान जिलानी सय्यद, तबस्सुम बेगम, तुकाराम गणपत बिराजदार, थोरात रविंद्र गणपतराव, नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसैन, नागोराव दिगंबर वाघमारे, प्रमोद किशनराव कामठेकर, फहाद सलीम शेख सलीम शेख, मजीद अ. अकबर, महमंद तौफीक महमंद युसुफ, महमद मुबीन शे. पाशा, महमद सलीम महमद इकबाल, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील, मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल, मोहम्‍मद वसीम, मोहम्मद सिद्दीक शेख संदलजी, युनुस खान, युनुसखॉं युसुफखाँ, रमेश दौलाती माने, लतीफ उल जफर कुरेशी, अॅड. विजयसिंह चौव्‍हाण, विनयमाला गजानन गायकवाड, वैशाली मारोतराव हुक्‍के पाटील, शाहरुख खमर, शिवाजी दत्तात्रय गायकवाड, साहेबराव नागोराव गुंडीले, ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले़ हे आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!