नांदेड| पोलिस ठाणे शिवाजीनगर येथील दाखल बँक फसवणूक तक्रारी अर्जातील अर्जदार अब्दुल रहेमान महेमुदखान पठाण यांना दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी अज्ञात व्यक्तीने कॉल करुन सांगीतले की तुमच्या क्रेडीट कार्डवर अंतरराष्ट्रीय खरेदीची सेवा सुरू झालेली आहे. सदर सेवेचे 4200 रु. वार्षीक फि आकरली जाईल. सदरची सेवा बंद करण्यासाठी आपल्याला आपल्या आय.सी.आय.सी.आय बँकच्या अपवरुन सदरची सेवा बंद करावी लागेल असे सांगीतले व व्हॉटसअप वर एक APK File पाठविली. सदरची एपीके फाईल ओपन केली असता त्या मध्ये क्रेडीट कार्डची माहीती भरायला सांगीतले.
क्रेडीट कार्डची माहीती सदरच्या अॅपवर भरताच तक्रारदार यांना क्रेडीट कार्डवर ऑनलाइन खरेदी झाल्याचा मेसेज आला असल्याने आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. सदरच्या क्रेडीट कार्ड मधुन 2,35,000/- रुपयांची फसवणूक केली असल्याचे समजले तक्रारदार यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशनला संपर्क केला असता त्यांना तात्काळ 1930 ला ऑनलाईन तक्रार करण्याचे सांगण्यात आले. तक्रारदार यांनी 1930 या ऑनलाईन पोर्टलवर तात्काळ तक्रार केली. तसेच पोलीस स्टेशन शिवाजीनगर व सायबर पोलीस स्टेशन, नांदेड येथे तक्रार दाखल केली व सदर तक्रारी वरून सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथील अधिकारी व अंमलदार यांनी, तक्रारदार यांच्याकडून घडलेल्या घटनेबाबत सर्व माहिती घेतली व तात्काळ संबधित बँका आणि wallet यांचे नोडल अधिकारी यांना ईमेलद्वारे संपर्क साधला.
त्यावरून संबंधित बँका आणि wallet यांनी तात्काळ कारवाई केली. सदर कारवाईच्या अनुषंगाने संबधित बँकासोबत आणि wallet सोबत वेळोवेळी पाठपुरावा करून तक्रारदार यांना फसवणूक झालेल्या एकुण रक्कमेपैकी 1,75,000/- रूपये त्यांच्या खात्यात परत मिळवुण देण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी मा. पोलीस अधीक्षक, नांदेड श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांचे आभार मानले. सदरची कार्यावाही मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे व अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन येथील पोउपनि जी.बी. दळवी व पोलिस अंमलदार राजेंद्र सिटीकर, विलास राठोड, दिपक शेवाळे यांनी पार पाडली.