नांदेड। एन्जॉय स्विमिंग ग्रुप नांदेडतर्फे ॲड. दागडिया व ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या २९ व्या भव्य जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या असून २६९ स्पर्धकांपैकी यशस्वी ठरलेल्या १२० जलतरणपटूंना आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देण्यात आली. पुढील वर्षी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यासाठी एन्जॉय ला मदत करणार असल्याची घोषणा आ. कल्याणकर यांनी याप्रसंगी केली.
कै.शांताराम संगणे जलतरणिका नांदेड येथे रविवारी सकाळी सात वाजता नांदेड भूषण नवनिहालसिंघ जहागीरदार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक अमोल आंबेकर, शेखर भावसार, भास्कर अत्रे, परीक्षित भांगे, केदार मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. एन्जॉय स्विमिंग ग्रुपचे दिवंगत सदस्य कै. व्यंकटराव मोरे, कै. बालकिशन जाजू, कै. दशरथ सुत्रावे यांच्या प्रतिमेला डॉ. पी सुदर्शन, दीपक बोधने, चंद्रप्रकाश लालवानी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये विविध ३० वयोगट पाडण्यात आले होते. त्यामध्ये पन्नास मीटर फ्रीस्टाइल व दोनशे मीटर आयएम च्या दोन वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये अभय देवकते,प्रतीती भावसार, कुलप्रकाशसिंघ पुजारी,अजिंक्य नरवाडे,इशान चालीकवार, मुकेश कबनुरे,श्रीषा देशमुख,श्रीकृष्ण पिन्नलवार,रेवांशु बिंगेवार,संकेत तोटावाड यांनी बाजी मारली. विविध गटात प्रथम पुरस्कार मिळवणाऱ्या मध्ये रवी नांगरे,सोनल चव्हाण, शेखर भावसार, प्रमोद कुलथे, शरणाप्पा इरसगडाप्पा, अंजना शिंदे, मनन सावरगावे, जिनल बिंगेवार, सपना हिंगमिरे, नागेश पवार, अर्जुन डाकोरे, रामेश्वर जाधव, शेख फिरोज, निशा गुडमेवार, अभिजीत भोसले, वैजयंता पाठक, ओमप्रकाश गुंजकर, प्रकाश वाकोरे यांचा समावेश आहे. डॉ.सुयश कथाडे, देविदास भालेराव, मारुती बादलगावकर, श्रीपाल पोरवाल,नंदींनी जैस्वाल,मनन सावरगावे, श्रेया सोनटक्के, प्राची बोबडे, गौरव केंद्रे, प्रणव बुचडे, कृष्णा वाईकर, रुक्मिणी सोनटक्के, बालाजी वाकोडे, राजेंद्र ताटे यांनी दुसरा क्रमांक मिळवला. चुरशीची लढत देऊन देखील भास्कर अत्रे,नवनाथ सावरगावे,विहान कांबळे, राजेश्वर बौधकुर, गंगाधर सूर्यवंशी,आरोही मोगले, आदित्य नरवाडे, जान्हवी जाधव, सुधाकर देव, उत्कर्ष कदम, आदित्य राजुरे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
बक्षीस वितरण आ. कल्याणकर, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, ॲड. चिरंजीलाल दागडिया, जयप्रकाश मुंदडा, गंगाधर बडवणे, उमेश दिघे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कार दीपक बोधने,मुकेशभाई ठक्कर, बालाजी एलगंटवार, सुभाष गादेवार, चंद्रप्रकाश लालवानी,मुरलीधर अट्टल, लक्ष्मीकांत माळवतकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक करताना एन्जॉय चे सचिव दिलीप ठाकूर यांनी स्पर्धा घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.आ. कल्याणकर, ॲड. प्रवीण पाटील,नवनिहालसिंघ जहागीरदार, जयप्रकाश मुंदडा,ॲड.दागडिया यांची समायोचित भाषणे झाली.शिरीष गीते यांनी आभार प्रदर्शन केले.
दिलीप ठाकूर व नवनाथ सावरगावे यांनी केलेल्या उत्कृष्ट धावत्या वर्णनामुळे स्पर्धेची रंगत वाढली.मुख्य पंच राजेश सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन ठाकूर, तुकाराम निलेवाड, मधुकर केंद्रे, प्रकाश गोवंदे, यादव डुबुकवाड, संजय जोंधळे, शेख रब्बानी, बालाजी कोकुरवार, मनोज कंडेरा, ओमसिंग ठाकूर, मयूर केंद्रे, सोहेल शेख, समीर शेख, अभिजीत कांबळे, माधव गच्चे यांनी तांत्रिक बाजू यशस्वी सांभाळली. समयलेखक म्हणून शैलेश तोष्णीवाल यांनी चोख बाजू सांभाळली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुष्कर तोष्णीवाल, रमेश डागा, द्वारकादास साबु, केशव मालेवार, व्यंकटेश जिंदम, , भास्कर स्वामी, डॉ. संतोष मालपाणी, डॉ.राजेश अग्रवाल, डॉ. सुनील बासटवार, नारायण चव्हाण, नरेंद्र कुलकर्णी, वसंत तोष्णीवाल, सुनील जाधव यांनी सहकार्य केले. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या क्रीडा रसिकांची चहा फराळाची उत्तम व्यवस्था एन्जॉय स्विमिंग ग्रुप तर्फे करण्यात आली होती. गेल्या २९ वर्षापासून नियमितपणे जलतरण स्पर्धा घेत असल्याबद्दल एन्जॉय स्विमिंग ग्रुपचे क्रीडाप्रेमी नागरिक कौतुक करत आहेत.