नांदेड। सोन्याची बॅग लिफ्टींग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील इसमाकडून 12 तोळे सोने व 500 ग्रॅम चांदी असा एकूण 8,18,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडने धमाकेदार कामगिरी केली आहे, त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.
नांदेड जिल्हयातील पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील सिडको येथील सोनारांच्या दुकानातून बॅग लिफटींगचे गुन्हे घडलेले होते. सदर गुन्हयांना आळा बसणेकामी व सदरचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी पोलीस निरीक्षक श्री उदंय खंडेराय यांना स्वतंत्र पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सपोनि रवि वाहुळे व पोलीस अंमलदार यांचे एक स्वंतत्र पथक नेमून त्यांना सूचना दिल्या होत्या.
सदर गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण हद्दीतील गुन्हयांच्या घटनास्थळी जावून भेट देवून माहिती घेतली व आरोपींचे गुन्हे करण्याच्या पध्दतीची सखोल माहिती घेवून पाठपुरावा केला असता आरोपी हे बाहेर राज्यातील असल्याचे निदर्शनास आल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांचे आदेशान्वये सदर पथकास तेलंगणा, आंध्रप्रदेश व ओडीसा राज्यात आरोपींचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आलेले होते. सदर पथकाने बाहेर राज्यात ‘जावून पंधरा ते विस दिवस मुक्कामी राहून गुन्हयातील आरोपींना निष्पन्न केले. सदर आरोपींनी नांदेड येथे किरायाने रुम केल्याची माहिती प्राप्त झालेली होती. सदर माहितीच्या आधारे सापळा लावून व सतत शोध घेवून निष्पन्न आरोपी नामे भिमा धनू प्रधान, वय 44 वर्ष, व्यवसाय बेकार, रा. पुरवाकोटे, जि. जाजपुर राज्य ओडीसा यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर आरोपीस विश्वासात घेवून पो.स्टे. नांदेड ग्रामीण गुरनं 561/2023 कलम 379 भा.दं.वि. च्या गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीकडून गुन्हयात चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 12 तोळे सोने व 500 ग्रॅम चांदी असा एकूण 8,18,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयातील इतर 05 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत. आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे देण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि श्री रवि वाहुळे, सपोउपनि माधव केंद्रे, पोहेकॉ/ गुंडेराव करले, पोहेकॉ/ संग्राम केंद्रे, पोहेकॉ दिपक ओढणे, पोहेकॉ/राजू सिटीकर, पोना/पव्यसिंह कांबळे, पोना/ दिपक पवार, पोना/संजीव जिंकलवाड, पोकॉ/ देवा चव्हाण, पोकों/बालाजी यादगीरवाड, चापोकों/कलीम शेख, मपोकॉ/ रेशमा पठाण, पोकों/गजानन बयनवाड, पोकॉ/ बावरी, पोकॉ/महेश बडगू यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.