नांदेडलाईफस्टाईल
हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाच्या गेटजवळ होणाऱ्या मत्स्यविक्री व उभ्या वाहनाला दुसरीकडं हलवा
हिमायतनगर। शहरातील सरकारी दवाखान्याच्या (ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील गेटजवळ मासळी विक्रीचा व्यवसाय चालविला जात आहे त्यामुळे रुग्णालयात ये जा करणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अडचण निर्माण होत आहे ही बाब लक्षात घेता गेट समोर लावण्यात येणारी हे दुकाने इतरत्र हटविण्यात यावी तसेच वाहनांना शिस्त लावावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिक उपचारासाठी येतात. मात्र रुग्णालयाच्या मुख्य गेट जवळच मासोळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांनी आपली दुकाने थाटली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उभे राहत असल्यामुळे तसेच दुचाकी वाहने देखील उभे राहत असल्यामुळे रुग्णालयात ये जा करणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण होत आहे एवढेच नाही तर या माणसाची दुर्गंधी परिसरात पसरत असल्यामुळे आजूबाजूचे व्यापारी दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.
एखाद्या अपघात ग्रस्त किंवा सिरीयस पेशंट आणि ॲम्बुलन्स आल्यानंतर त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी नेण्याचे वेळ आले असता अडचन येते आहे. मासळी विक्री केल्यानंतर त्यामुळे थेटलेले सर्व तुकडे याच ठिकाणी सोडून जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. ही बाब लक्षात घेता या ठिकाणी बसणारे मासोळ्या विक्रीची हे दुकाने इतरत्र हलविण्यात यावी. कारण या दुर्गधीचा त्रास दवाखाना व आजुबाजूस आसलेल्या मेडीकल व इतरांना होतो आहे.
रुग्णालयातून इमर्जन्सी जाणाऱ्या रुग्णवाहिकेमुळे किंवा अन्य वाहनामुळे एखादी दुर्घटना या दुकानामुळे घडल्यास यास नगरपंचायत जबाबदार राहिली त्यामूळे जर एखादी दुर्घटना होण्या अगोदर मासोळ्या विक्रेत्यांना दुसरी कुठं कुणाला त्रास होणार नाही अशी पर्यायी जागा उपल्ब्ध करुन द्यावी आणि रुग्णालयात व परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.या निवेदनात वर रितेश प्रमोद पिंचा, रहमत भाई, सतोष क्यादलवार, किसन डोरलेवार, शे फिरोज, गिते साहेब, गंगाराम डाके, बापू डाके आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.