उस्माननगर, माणिक भिसे| वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाच्या औचित्य साधन शिराढोण येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख जयवंत काळे व सहशिक्षक यांच्या वतीने उस्मान नगर परिसरातील पत्रकारांचा दर्पण दिनी पेन, डायरी पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
शिराढोण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस म्हणून दर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिराढोणगरीचे सरपंच तथा प्राचार्य खुशाल पांडागळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून , माझे उपसरपंच साईनाथ पाटील कपाळे , पत्रकार व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी सामूहिक स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. शाळेच्या वतीने केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक जयवंत काळे सर व शिक्षक वृंदा यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार देऊन स्वागत केले. त्यानंतर दर्पण दिनी उस्मान नगर व शिराढोण येथील पत्रकारांचा शान पुष्पहार वही पेन देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सरपंच तथा प्राचार्य खुशालराव पांडागळे ,पत्रकार सूर्यकांत माली पाटील , पत्रकार शिवकांत डांगे , यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उस्माननगर येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे,लक्ष्मण कांबळे, सुर्यकांत माली पाटील,लक्ष्मण भिसे ,शिवकांत डांगे,शुभम डांगे, यांच्या सह अनेक पत्रकारांचा पेन डायरी पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेसाठी दैनंदिन परिपाठासाठी स्पीकर भेट देण्यात आला .या कार्यक्रमासाठी व्ही . जी.बिज्जेवार ,सौ. छाया बोनगुलवार ,सौ. कल्पना पडुळे, सुर्यकांत उत्तरवार , मधुकर कारामुंगे ,श्रीमंगले शिवाजी ,सौ.अनिता बिजमवार, बाबाराव विश्वकर्मा यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षक पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक बाबाराव विश्वकर्मा यांनी केले .,तर आभार श्री काळे यांनी मांनले.