नांदेड। जिल्हा परिषद हायस्कुल माळाकोळी येथील 1985 च्या दहावीच्या वर्ग मित्र मैत्रिणींचे स्नेह संमेलन दि.1.10.2023 रोज रविवारी नांदेड येथे हाॅटेल तुलसी कम्फर्ट येथे खेळीमेळीच्या वातावरण संपन्न झाले. यावेळी एकमेकांची माहिती देताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले होते.
कार्यक्रमाला सकाळी ठीक 11:00 वाजता सुरुवात झाली, प्रथम सरस्वती मातेचे पूजन करून राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सर्व 1985 च्या दहावी वर्गास शिकवणार्या शिक्षकांचा येथोचीत गौरव व सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व 1985 च्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांनीनी आपल्या कुटुंबाचा परिचय करुन दिला. तसेच आपली मुले काय करतात हे सुद्धा नमूद करून शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, पोलीस, उपजिल्हाधिकारी, गुत्तेदार, अधिकारी यांनी आपल्या व्यवसायातील अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे संचालन व्यंकट केंद्रे व बळीराम जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान तेलंग सरानी भुषविले समारोप प्रसंगी तेलंग सरांनी सांगितले की, स्पर्धेचे युग आहे अनेक संकटे येतात त्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद ठेवा. खचुन जावु नका येणाऱ्या संकटाला तोंड देत चला. सत्याचा विजय असतो कर्म चांगले करा फळ चांगले मीळेल नैतिकतेने वागा आसा अनमोल उपदेश केला. या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर ऐकलारे,मंदार वैघे,संजय डोंगरे, बळीराम जाधव, व्यंकट केंद्रे, रमाकांत पांचाळ, शिवाजी केंद्रे, हाणमंत तिडके, देविदास राठोड, मधुकर नागरगोजे, शिवाजी वाघमारे यांनी परिश्रम घेतले.