हिमायतनगर| स्पर्धेच्या युगात युवा पिढीने कुस्त्यांसह, कबड्डी व मैदानी खेळात स्पर्धेत सहभागी होऊन सक्रिय झाले पाहिजे. यामुळे आपल्या शरीराच्या सुदृढतेत वाढ होईल आणि खेळाच्या माध्यमातून देशपातळीवर नावलौकिक मिळविन्यास मदत होईल असे आवाहन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी पाचशिव महादेव फाटा येथील यात्रेच्या सेवटच्या दिवशी कुस्त्यांची दगंल रंगली होती याप्रसंगी बोलताना केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पाचशिव महादेव फाटा येथील यात्रा गेल्या चार दिवसापासून सुरूवात झाली होती.लेझीम, खो. खो. स्पर्धेसह, कबड्डी यासह विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. 5 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजेपासून कुस्त्या सुरू झाल्या होत्या.या कुस्त्यांचा शुभारंभ आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यात्रा कमिटीच्या वतीने आ. जवळगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. जवळगावकर बोलताना म्हणाले की आजच्या घडीला तरुण खेळापासून दुर जात आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंनी कुस्ती, कबड्डी यासारख्या स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे या खेळातून आपल्या कलागुणांना वाव मिळतो म्हणून तरुणांनी खेळाडू बनले पाहिजे असे जवळगावकर म्हणाले या कुस्त्या मध्ये सहभागी झालेल्या पैलवानाना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले आहे. या कुस्त्या पाहण्यासाठी तालुक्यातील यात्रेकरुनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती सेवटची कुस्ती उमरी तालुक्यातील बितनाळ येथील पैलवान संजय उमाटे पाटील, अनिल हरियाणा या अतिशय चुरशिची झाली आहे, संजय उमाटे या पैलवानानी कुस्ती जिंकली आहे.
यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, संचालक शेख रफिकभाई, सभापती जनार्दन ताडेवाड, संजय माने, डॉ प्रकाश वानखेडे, सरपंच मारोती वाडेकर, अ. बाकी भाई, योगेश चिलकावार, प्रविण जाधव, बाबुराव बोडावार, प्रकाश जाधव, पोलीस जमादार काईतवाड,ठाकरे,संतोष आनगुलवार,बिरकलवार यांच्यासह सवना, महादापुर, वाशी पार्डी, चिचोर्डी , जिरोना पंचक्रोशीतील यात्रेकरुंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यात्रेच्या सेवटच्या दिवशी यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.