Youth Should Stay ; तरुणांनाे दारुच्या व्यसनापासून दूर राहा – युवा किर्तनकार प्रा.डाॅ.प्रशांत ठाकरे महाराज

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। व्यसन ही मानवी जीवनाला लागणारी किड आहे. ज्यामुळे अनेक सुखी कुटुंबाची दुर्दशा झाली आहे.आर्थिक व सामाजिक ऱ्हास होतांना दिसत आहे.काही लोक दारू पिऊन घरी येतात आणि आपल्या पत्नीला मारतात. लहान वयातच दारु,सिगारेट, गुटखा, अदी व्यसनाने जीवनात अनेक अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे कुटुंबात अशांतता निर्माण होत आहे.
अशा लहान खेड्यात काही गाव गुंडानकडून मुबलक प्रमाणात उपलब्ध करुण दिलेली दारू हा चिंतेचा विषय ठरू शकतो. यासाठी व्यसनापासून दुर होऊन नित्याने सामुदायीक प्रार्थना, ध्यान केले पाहिजे तसेच गावात प्रबोधनाचे कार्यक्रम व सामाजिक चळवळ उभी करणे अत्यंत गरजेचे झाले असल्याचे त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून, चालू राजकीय घडामोडींवर कडाडून टीका केली.प्रा.डाॅ.प्रशांतजी ठाकरे महाराजांनी आपल्या कीर्तनातून लोकांना वास्तव्याची ओळख दाखवून जनतेसमोर प्रेरणादायी विचार सुद्धा मांडले. तर तरुणांना दारुच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
श्री गुरूदेव सेवा सा.प्रा.मंडळ तथा समस्त गावकरी मंडळ करंजी यांच्या संयुक्त विद्यमाने माहूर तालुक्यातील राष्ट्रसंतांच्या पावन परशाने पविञ झालेल्या करंजी या गावात वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त झालेल्या किर्तनातून ते बोलत होते.”लोकांशी जे शिकवावे, आधी आपणचि आचरावे,नुसते पुढारी म्हणोनि मिरवावे, तेणे आदर ना वाढे “आज पुढार्यांनी जर ग्रामगीता हातात घेतली आणि त्यानुसार आचरण केले तर खरोखरच समाजाचे व त्याचे स्वतःचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.
आज एवढं व्यवसनाचं मोठ संकट संपूर्ण विश्वावर असताना जगभरात, देशभरात जे राजकारण, आरोप प्रत्यारोप सुरु आहे ते अतिशय हीन आहे.” कष्टासाठी कोणीही मरो, प्रतिष्टेसाठी आपणची उरो”हि प्रवृत्ती देशविघातक आणि देशाला मागे नेणारी आहे. म्हणून या प्रवृत्तीला अशा संकटाच्या वेळी जागे करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांचे विचार हि काळाची गरज असल्याचे प्रा.डाॅ.प्रशांत ठाकरे महाराज म्हणाले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त येथील सामुदायिक प्रार्थना मंदिर परिसरात दि.१६ फेब्रु २०२५ रोजी सकाळी ६.०० वा.सामुदायिक ध्यानपाठ व ८.०० वा पालखी मिरवणुक पुजन सोहळा, रामधुन हरी पाठ करण्यात आले असून दुपारी १२.३० वा. श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ करंजी तथा संगित विशारत ताटेवार गुरुजी आणि त्यांचा संच यांनी बहारादार भजनाचा कार्यक्रम केला. तदनंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शनत्पर आपले विचार मांडले सायं. ४.५८ वा. राष्ट्रसंतास श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. रात्री ९.०० वा.प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांचे दणदणीत किर्तन झाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी,उपाध्यक्ष दत्तातेय पेटकुले,सचिव बबन पोलसवार, अ.आघाडीचे ता.अध्यक्ष गोपाल गुर्हे महाराज,तुळशीरामजी पाटील, ईस्तारी शेंडे, अंबादास मोहुर्ले, मारोती नागा चौधरी, गणपत चौधरी यांनी परिश्रम घतले असून विशेष सहकार्य येथील उपसरपंच संदीप सिद्धेवार व संपुर्ण ग्रा.पं. पदाधिकारी करंजी यांचे लाभले.या कार्यक्रमाचे सुञ संचलन एकनाथ गावञे यांनी केले.
