उस्माननगर। सिडको उस्माननगर राष्ट्रीय महामार्ग ५० सिडको कडुन येनारा लाठखुर्द ता . कंधार येथील तरुणाचा मोटारसायकल च्या धडकेत मृत्यू झाला.
मिळालेल्या माहिती नुसार लाठखुर्द ता.कंधार येथील गोविंद संजय इंगोले वय २१ दि. १५ जानेवारी रोजी एम.एच. २६ बी.टी. ३२९१ स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल ने सिडकोहुन गावाकडे येत असतांना उस्माननगर जवळील कॅनॉल जवळ रात्री साडेनऊ च्या दरम्यान शेख मुक्कदर गफुरसाब वय ३५ रा. काहाळा बु.ता. नायगाव . मोटार सायकल नं एम एच १५ बी के.५९९३ गाडीला धडक झाली .
गोविंद इंगोले जबर जखमी झाले दवाखाण्यात नेत असताना रस्त्यातच मृत्यु झाला तर शेख मुक्कदर गंभीर जखमी असुन खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. इंगोले यांचे पार्थिवावर लाठखुर्द येथे शोकाकुल वातावरणात दि. १६ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांचे पश्चात आई, वडील,भाऊ असा परिवार आहे. या गंभीर घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. बातमी लिहीपर्यंत उस्माननगर ठाण्यात गुन्हा नोंद झाल नव्हता.