बिलोली/नांदेड। बिलोली तालुक्यातील नागणी येथील योगेश गंगाधर तळणे या तरुणाने अथक प्रयत्नाने बँक आफ इडिया या फिल्ड अधिकारी पदाची परिक्षा उतीर्ण झाले. योगेश याचे आई-वडिल अल्पभूधारक शेतकरी आसुन त्यानी नागणी गावात मिळेल त्याच्या शेतात मोल-मजूरी करून मुलाला शिकवीले मुलगा योगेश यांच्या या निवडीमुंळे आई-वडीलाना अंनद झाला आहे.या यशाचे सर्व श्रेय योगेश यानी आई-वडिलाना दिले आहे.
योगेश तळणे याची बँकेच्या अधिकारी म्हणून निवड झालेल्या बातमीने नागणी व कुंडलवाडी परिसरातून अभिनंदन होत आहे.नागणी या गावातून याआधी प्रशासकीय अधिकारी म्हणून आमोल आगळे.अविनाश आगळे.आकाश आगळे.सचिन आगळे याची निवड झालेली आहे. यांच्या सर्वाच्या प्रेरणेमुळे मलाही काहीतरी स्वतः साठी व कुटुंबासाठी अभ्यास करण्याचा मार्ग मिळाला व मला या स्पर्धा परिक्षेत यश मिळाले अशी प्रतिक्रिया योगेश यानी दिली.
योगेश गगांधर तळणे याचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्राथमिक शाळा नागणी,माध्यमिक शिक्षण सगरोळी तर एच,एस.सी (12) संत ज्ञानेश्वर मा.उच्च माध्यमिक विद्यालय धुप्पा.शंकरनगर तर वाणिज्य शाखा घेऊन पदवी यशवंत महाविद्यालय नांदेड व बँकेचे स्पर्धा परिक्षाची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथे केली.योगेश तळणे यांच्या निवडीमुळे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर.प्राचार्य संजय पाटील शेळगांवकर.योगेशचे मामा हाणमंतराव आगळे.विनायकराव आगळे.नागणीचे सरपंच संतोष आगळे.आण्णाराव शिंदे.राजेश आगळे.मंगेश आगळे.व पत्रकार सुनिल रामदासी यानी योगेश तळणे यास शुभेच्छा दिल्या तर नागणी.कुंडलवाडी व बिलोली तालुक्यातील अनेकांनी योगेश च्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.