
हिमायतनगर। तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून सोयाबीन पिकावर यलो मौजेक नावाचा रोग आला असून, कवळ्या शेंगा परिपक्व होण्याच्या अगोदरच सोयाबीनचे झाडे कोमजुन जात आहेत तर पाने पिवळी पडून सोयाबीन ची उत्पादकता घटण्याची शक्यता वाढली आहे. अगोदरच शेतकरी राजा हैराण असतांना आता हातातोंडाशी आलेल्या पिकांवर सततच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अर्थिक संकटात सापडला आहे.
हिमायतनगर तालुक्यात खरीप हंगामात पेरणी झाल्यानंतर अतिवृष्टी झाली, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून व खरडून गेल्यानं शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यातून कसेबसे बाहेर येताच पिकांची वाढ खुंटली, आणि आता हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकावर येलो मोजेक नावाच्या व्हायरसचा हल्ला झाला आहे. यामुळं पिके पिवळी होऊन सोयाबीनच्या शेंगा कोमेजू लागल्या आहेत.
असाच प्रकार तालुक्यातील मौजे दरेगाव येथील शेतकरी रावसाहेब राठोड यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीनवर दिसून आला आहे. येलो मोजक नावाच्या रोगाचे अटॅक केला असून, यामुळे सोयाबीनच्या उताऱ्यामध्ये 50 ते 60 टक्के घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महागामोलीचे खते व बियाणे, विविध प्रकारचे कीटकनाशके फवारून शेतकऱ्याने भक्कम असा खर्च केलेला आहे . मात्र यलो मौजेक नावाच्या रोगामुळे शेतकरी हतबल झाला असून, सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची चिंतेत शेतकरी दिसतो आहे. एकूणच सध्याच्या परिस्थितीमध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी राजा चिंतातुर झाला आहे.
