महाराष्ट्र

पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांचा अंदाज

मुंबई| पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे.

या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!