आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या नांदेड जिल्हा प्रसिद्धी कोषाध्यक्ष पदी रामप्रसाद चन्नावार व तालुका प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी तर तालुका सदस्य पदी लक्ष्मण चन्नावार यांची निवड
नायगाव। आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र जिल्हा प्रसिद्धी कोषाध्यक्ष पदी रामप्रसाद चन्नावार व तालुका प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी. तालुका सदस्य पदी लक्ष्मण चन्नावार.यांची शाखा हुस्सा ता.नायगाव येथे नामफलकाचे अनावरण व नियुक्तीपत्र वितरण सोहळ्यात आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य ह.भ. प. श्री राम महाराज पांगरेकर यांच्या शुभ हस्ते देण्यात आले.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर हंबर्डे,सचिव व्यंकटराव जाधव.सहसचिव प्रभाकरराव पा. पुयड कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड, जिल्हा प्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल जि.प्र उ.प्रमुख अशोकराव वाघमारे ,संस्थेचे सदस्य श्री प्रवीण रौतुलवाड,श्री गुलाबराव पा.उबाळे,श्री हरिनाम पा.कदम,श्री संतोष पा.कदम,श्री भगवान पा.रहाटीकर.श्री त्रिमुख पा.येडके.यांच्या उपस्थितीत सांप्रदायाच्या निगडित असलेले व नायगाव येथील पत्रकार रामप्रसाद चन्नावार यांची नांदेड जिल्हा प्रसिद्धी कोषाध्यक्ष पदी नियुक्तीपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व मित्रमंडळी नातेवाईक आम्ही वारकरी संस्थेचे सर्व पदाधिकारी इत्यादींनी चन्नावार यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.