बिलोली| नांदेड लोकसभा मतदार संघांसाठी वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल ते आम्हाला मान्य असून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा पक्ष निरीक्षक दिलीपराव शिंदे यांनी बिलोली येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत शिवसैनिक, शिवदूत, बूथप्रमुख यांना केले.
बिलोली येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी शिवसेना शिंदे गटाची लोकसभा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख मागासवर्गीय विभाग मंगेश कदम,तालुकप्रमुख बाबाराव रोकडे पाटील,भिमराव चौगुले, देगलूर तालुका प्रमुख घाळप्पा अंबेसंगे,जिल्हा उपप्रमुख महिला आघाडी सावित्राताई चप्पलवार, शिवाजीराव येडगुले, माजी नगरसेवक बिलोली महेंद्र गायकवाड,युवासेना तालूकाप्रमुख अरविंद पवनकर, शहरप्रमुख श्रीकांत गादगे, कुंडलवाडी शहरप्रमुख लक्ष्मण गंगोने, गंगाधर शिंदे, उमाकांत बादेवाड, बाळू जगदमवाड,शेतकरी सेना तालुका प्रमुख मारोती सिद्धपुरे, अरविंद पेंटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आढावा बैठकीत लोकसभा निरीक्षक दिलीपराव शिंदे यांनी बिलोली तालुक्यातील गावनिहाय, बूथनिहाय माहिती घेतली असून बिलोली तालुका हा शिवदूत करण्यात अव्वल असल्यामुळे सर्व शिवसैनिकांचे अभिनंदन केले आहे. यावेळी तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.सावळी ग्रामपंचायत सदस्य राहुल सावळीकर, रुद्रापूरचे ग्रामपंचायत सदस्य पवन गिरी, हनमलू तोटलवार , सचिन हिवराळे, बालाजी पांचाळ,सुरेश जाधव, शैलाताई कांबळे यांच्यासह तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी असंख्य शिवसैनिकाना नियुक्ती पत्र देऊन पक्ष वाढीची जबाबदारी देण्यात आली.या आढावा बैठकीला उप तालुका प्रमुख मारोती नरवाडे, वसंत जाधव, रामेश्वर हिवराळे, उज्वल चेटे, राम काळे, मन्मथ महाराज, चंद्रशेखर भोरे,शंखपाळे ,सुनील भास्करे, बुध्दम जाधव,लक्ष्मण रायकंठवार,विक्की सोनकांबळे, महंमद इस्माईल,गंगोने, गजानन कोपरे, गोविंद जाधव, शाम बंडगर, रमेश साखरे, देगलूर सोशल मीडिया प्रमुख जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
देगलूर -बिलोली मतदासंघात भावी आमदार शिवसेनेचाच – शिंदे
देगलूर बिलोली मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून हा मतदारसंघ पुर्वीपासूनच शिवसेनेचा असल्याने हा मतदारसंघ शिवसेना मोठया ताकदीने लढविणार असून भावी आमदार म्हणून मंगेश कदम यांच्या नावाचा उल्लेख केला त्यामुळे भावी आमदार हा शिवसेनेचा असेल असे मत व्यक्त केले.