क्राईमनांदेड

रामतिर्थ येथे ईव्हीएम फोडल्याची व बिलोली शहरातील बोगस मतदान करण्याची घटना वगळता बिलोली तालुक्यात मतदान शांततेत

बिलोली, गोविंद मुंडकर। तालुक्यातील रामतिर्थ येथील एका उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार असलेल्या तरूणाने धारदार वस्तूच्या साह्याने ईव्हीएम मशिन मशिन फोडल्याची घटना घडली.सदर तरूणास पोलिसांनी ताब्यात घेऊन नवीन मशिन उपलब्ध केल्याने पुढील मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.तर बिलोली शहरातील एका मतदान केंद्रावर एकाच्या नावावर दुसऱ्याने बोगस मतदान करण्याचा सफल प्रयत्न केला. या दोन घटना वगळता बिलोली तालुक्यात मतदान शांततेत झाले आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्या पासून मतदानाला सुरुवात झाली.तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास भैय्यासाहेब येडके हा तरूण मतदान करण्यासाठी आला होता . मतदान केंद्रावरील सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मतदानासाठी ईव्हीएम समोर गेल्यावर येडकेने आपल्या खिशातील धारदार वस्तू यांच्या ईव्हीएमवर घाव घातला.मशिन फुटल्याचा आवाज होताच केंद्रातील निवडणूक अधिकारी यांनी येडके याच्या जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या हातात धारदार वस्तू दिसली. त्याच वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचा-यांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. वरिष्ठांना घटनेची माहिती दिली.

सदर घटने नंतर वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्या ठिकाणी नवीन मशिन बसवून पुढील प्रक्रियेला सुरूवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.तर बिलोली शहरातील कन्या शाळा येथील मतदान केंद्रावर एका मतदाराच्या नावावर बोगस मतदान करण्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब माध्यम प्रतिनिधींच्या लक्षात आणून दिली. याबाबत ठोस कारवाई झाल्याचे अद्याप समोर आले नाही.याबातची सविस्तर माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली नाही. बिलोली शहर व रामतिर्थ येथील घटना वगळता बिलोली तालुक्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली आहे.

चिखलीकर व गोपछडे यांची मतदान केंद्रांना भेटी

नांदेड लोकसभा मतदार संघातील भारतीय छनता पक्षाचे उमेदवार खा.प्रतापराव पा.चिखलीकर व राज्यसभेचे नवनिर्वाचीत खासदार डाँ.अजित गोपछडे यांनी काल मतदानाच्या दिवशी बिलोली शहरासह तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी करत लोकशाहीचा मोठा उत्सव असलेल्या या मतदान प्रक्रीयेत सहभाग घेऊन मोठ्या संख्येने मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले.

यावेळी बिलोली शहर विकास कृती समितीचे गोविंद मुंडकर, विजय कुंचनवार, सुभाष पवार, मिलिंद पाडाळकर, भाऊ बिलोलीकर यांच्यासह माधव शंकपाळे, किशन पटाईत,अर्जुन खंडेराय, गणेश खंडेराय, यशवंत गादगे, इंद्रजीत तुडमे,आदी उपस्थित होते. यावेळी प्रतापराव चिखलीकर यांनी जिल्हा परिषद सदस्य ठक्करवाड आणि माजी नगराध्यक्ष यादराव तुडमे यांच्यासह माजी आमदार गंगाधरराव पटणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!