नवीन नांदेड। वसंतराव नाईक महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर इतिहास विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या उपस्थितीत महाविद्यालय प्रांगणातून सहलीचे प्रस्थान झाले.
कंधार येथील राष्ट्रकुट राजघराण्याची उपराजधानी असलेल्या भुईकोट किल्ल्याविषयी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. संजय गिरे यांनी सविस्तर माहिती सांगितली.
उदगीर येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची खंदक, बुरूज, पंचधातुची विदेशी तोफ, दारूखाना, दिवाणेआम, दिवाणेखास, जनानखाना आणि कील्यावरील जल व्यवस्थापन या विषयी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.अनंत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या सहलिच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ.संजय गिरे, प्रा. करण हंबर्डे,प्रा.सोमनाथ खोडे,डॉ.शोभा वाळुककर,प्रा.किरण नरवाडे आणि इतिहास विषयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.