श्रीक्षेत्र माहुर, इलियास बावानी| राज्याचे कौशल्य उद्योजकता व नवीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सुचनेवरून स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या हिरकणी सभागृहात शुक्रवार दि. 25 जुलै रोजी स. 11वा. अनिरुद्ध केंद्रे यांच्या अध्यक्षतेत कारगिल विजय दिवस संपन्न झाला.

यावेळी पो. नि. गणेश कराड, संजय सुरोशे, सतीश काण्णव, पंडित पेंडारी, माजी सैनिक बी. एल. काळे, पवन यादव, विजय पवार, राजाराम बागुलवार, काशीराम आरके व बळीराम कडमेते यांची प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होते. कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून मान्यवरांनी आपले विचार मांडले.

यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य फारुकी वासे, गटनिदेशीका ए. एन. पोतदार, शिल्पनिदेशक बी. व्ही. अंबोलकर, एस. एस. डाकोरे, एन. बी. चिरडे, यु.डी. चव्हाण, आर. के. जगदाळे, व्ही. डी. मानकर, कपिल शेख, एम. आर. मेकलवार, कुसुम मेशेकर, रागिणी खडसे,के. एन. वाकोडे, ए. एल. रामटेके, आर. व्ही. ठमके, लिपिक बुटले,व्ही. के. पवार, बी. जे. मुंडे व आर. डे. देशमुख यांनी परिश्रम घेतले.

