उस्माननगर| येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा येथे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिवस अनिरुद्ध सिरसाळकर व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रमातून अतिशय उत्साहात साजरा केला गेला.
गणित दिनानिमित्त दिवसभर शाळेत सर्व गणतीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम दररोज घेण्यात येणारा परिपाठ हा सुद्धा गणितीय परिपाठ घेण्यात आला. त्यामध्ये गणितीय गाणे, गणिता मधून उखाणे, गणितातील गंमतशीर गोष्ट, गणितावरील कुट प्रश्न, बावीस या दिनांका चे महत्व, व इतर अशा अतिशय विविध गणितीय क्रियातून परिपाठ साजरा करण्यात आला .
परिपाठ साजरा करण्यासाठी अक्षरा मोरे, गायत्री जाधव , श्रुती कांबळे, अनुजा घोरबांड यांनी अतिशय सुरेख असा परिपाठ सादर केला .त्यानंतर, तालुका तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलेल्या अक्षरा मोरे ,गायत्री जाधव व मार्गदर्शक श्री सिरसाळकर सर यांचा शालेय समितीतर्फे व शाळेतर्फे सत्कार करण्यात आला . गणित डे कार्यक्रमांमध्ये गणित उत्सव शाळेमध्ये साजरा करीत असताना एका संपूर्ण वर्गात गणिती गार्डनचा देखावा उभारण्यात आला होता . त्यानंतर गणित संकल्पना व संबोध असलेल्या रांगोळी स्पर्धा मुलींसाठी घेण्यात आल्या . द्वितीय सत्राता गणित संबोधित चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या गणित उत्सवात विद्यार्थिनींनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला. गणित शिक्षक अनिरुद्ध सिरसाळकर सर यांच्या कल्पनेतून आणि मेहनतीतून सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांच्या सहकार्यातून हा गणितोत्सव अतिशय उत्साहात पार पडला.