नांदेड। पी एफ सी संस्था मुखेड व शाहीर महश्री आत्माराम पाटील शाहीर मंच आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती .संत गाडगेबाबा जयंती व शाहीर महश्री आत्माराम पाटील जन्मशताब्दी निमित्त भव्य लोककला महोतवाचेआयोजन दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पीएफसी संस्था काळू तांडा तालुका मुखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी अकरा वाजता करण्याचे ठरविले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुरावजी केंद्रे अध्यक्ष वयोवृद्ध कलावंत निवड समिती नांदेड प्राध्यापक बदने सर शाहीर सूर्यकांत शिंदे मांजरमकर साहित्यिक दिगंबर कदम यावेळी उपस्थित राहणार असून या होणाऱ्या कार्यक्रमास बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा पारंपारिक लोककला शाहीर संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष .माधवराव पाटील जळगावकर मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष तथा .संपादक वृत्त वारसदार हिमायतनगर क्राईम संपादक तिरत्नकुमार भवरे यांच्या सामाजिक सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना कला तपस्वी पुरस्कार2023 2024 चा जाहीर करण्यात आल्याचे आयोजक दत्ता तुमवाड बी एफ सी संचालक. शाहीर अंबादास तावरे ज्येष्ठ शाहीर दिगू तुमवाड यांनी कळविले असून तरी नांदेड जिल्ह्यातील कलावंतांनी या होत असलेल्या कला महोत्सवास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे शेवटी आयोजकांनी कळविलेली आहे.
त्रिरत्न कुमार मा.भवरे कामारीकर यांच्या सामाजिक पत्रकारिता व धार्मिक कार्याच्या कामाची पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार असून त्रि रत्नकुमार भवरे यांनी नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील व ग्रामीण भागातील वंचित असलेल्या कलावंतांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलेला आहे ते दरवर्षी कलावंताचे भव्य कला महोत्सव असो किंवा कलावंतांचा मेळावा असो त्या कलावंतांना ते संघटित करण्याचे काम करत असतात.
आज पर्यंत त्यांनी अनेक दिग्गज कलावंतांना पाचारण करून तळागाळातील कलावंतांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले आणि त्या कलावंतांचा त्यांनी सन्मानचिन्ह व गौरव पत्र देऊन सन्मान केलेला आहे. त्या कार्यक्रमास आम्हीही स्वतः उपस्थित होतो खरंच त्यांच्या कामाची व कलावंताबद्दल त्यांची तळमळ ते ओळखतात आणि कलावंतासाठी अहोरात्र झगडतात कलावंतांना न्याय मिळावा म्हणून ते सदैव प्रयत्नशील असतात कलावंतांना मानधन मिळावं म्हणून ते सदैव पाठीशी असतात कारण जे कलावंत खरे आहेत.
ते वंचित राहून म्हणून ते सदैव खऱ्या कलावंता च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात म्हणून त्यांचा हा या ठिकाणी गौरव केला जातो आज आम्ही बघतो दरवर्षी कलावंताचे ते मिळावे घेतात त्यांचं हे एकवीस वर्षे आहे हे अभिमानाने आम्हाला सांगावसं वाटतं म्हणून या होत असलेल्या कला महोत्सवास नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम कलावंतांनी या कार्यक्रमास हजेरी लावावी असे ज्येष्ठ शाहीर दिगू तुमवाड यांनी आवाहन केले आहे केले आहे.