हिमायतनगर│हर घर तिरंगा अभियानाच्या अनुषंगाने हिमायतनगर नगरपंचायतच्या वतीने मंगळवारी उमरखेड रोड वरद विनायक मंदिर परिसरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शहर व परिसरातील शाळा–महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाला तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी सौ पल्लवी टेमकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, तिरंग्याबद्दलची जाणीव आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा याविषयी मार्गदर्शन केले. नगरपंचायतीचे अधिकारी, शिक्षकवर्ग आणि नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती.

तसेच दिनांक १४ ऑगस्ट रोजी हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्याने, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच भाजप पक्षाच्या सहभागातून दिनांक 14 ऑगस्ट (गुरुवार) रोजी श्री परमेश्वर मंगल कार्यालय मैदानातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यां तिरंगा रैलीत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी ” सहभागी होऊन भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणां दिल्या आजच्या तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय झाले होते.

