
नांदेड| दि.3 मार्च 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे समाजाच्या नेत्या तथा रणरागीणी सौ. गीतांजली ताई कोळी धुळे जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली शासनाने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी कुऱ्हाड (प्रतिकात्मक) मोर्चा लाखोंच्या संख्येने होणार असून त्या संदर्भाने आज दि.18 फेब्रुवारी 2025 मंगळवार रोजी सायंकाळी ठिक 4 वाजता महात्मा गांधी पुतळा नांदेड येथे समाजाचे नेते तथा कोळी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष शंकरराव मनाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी कोळी समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक पार पडली. यावेळी शंकर मनाळकर व उपस्थित समाज नेते आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीला सांगोपांग विचार विनिमय करून मार्गदर्शन केले.
या बैठकीमध्ये खालील प्रमाणे ठराव पास करण्यात आले असून यामध्ये तामसा तालुक्यातील समाज भगीनीवर झालेल्या अत्याचार पिडीत कुटूंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, आदिवासी कोळी समाज बांधवांकडून आपआपल्या परीने आर्थिक मदत त्या कुटूंबाला द्यावी, त्या आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्या समाज भगीनींना न्याय मिळवून देण्यासाठी या संदर्भाने राज्य शासनाकडे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक यांना कोळी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष शंकरराव मनाळकर यांच्या नेतृत्वाखाली व समाजाच्या नेत्या गितांजलीताई कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.20 फेब्रुवारी 2025 गुरूवार रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मागणीचे निवेदन देणे आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी दि. 20 फुब्रुवारी 2025 गुरूवार रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपस्थित राहण्याचेही यावेळी आवाहन करण्यात आले असून कुऱ्हाड मोर्चासाठी आझाद मैदान मुंबई येथे जाण्यासाठी दि.2 मार्च 2025 रोजी नांदेड रेल्वे स्टेशनवर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने जमावे असेही यावेळी आवाहन करण्यात आले.
यावेळी बैठकीला शंकरराव मनाळकर, शिवाजीराव गलांडे, आनंदराव रेजीतवाड, केरबा जेठेवाड, प्रल्हाद मद्देवाड, प्रभाकर केंगल, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गुणवंत एच.मिसलवाड, माधव पुनवाड, शिवाजी नाईकवाडे, भालचंद्र मोळके, सुधाकर भिसे वसरणी, माधवराव बोईनवाड, गणपतराव नरवाडे, मोगलाजी पोशट्टी चातरमल, बालाजी गुल्लेवाड, पांडूरंग झुडपे, लक्ष्मण नागीरवाड, कल्याण मोळके, आडेलु पंजेवाड, तुळशिराम देवरवाड, रमेश बोईनवाड, संतोष पेठकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीचे प्रास्ताविक के.एन.जेठेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन गुणवंत एच.मिसलवाड यांनी मांडले. याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
