नांदेड| पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी आगामी लोकसभा व विभानसभा निवडणुक अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील रेकॉर्डवरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे आरोपीची योजना तयार करुन आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने व त्यांच्याकडुन वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत असलयाने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने 47 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमन्वये 179 प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. आज पावेतो 19 टोळ्यामधील 56 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले असुन MPDA अंतर्गत 11 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.
पोलीस ठाणे वजिराबाद यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे 1. मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफार वेग, राहणार- खडकपुरा, नांदेड पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे 2. आतिष जिवनसिंग ठाकुर, राहणार असदवन, नांदेड तसेच पोलीस ठाणे इतवारा यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे 3. रबज्योतसिंघ ऊर्फ गब्या जसविंदरसिघ तीवाणा, राहणार- भगतसिंग रोड, इतवारा, नांदेड याचेवर गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशिरित्या शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, खंडणी मागणे, दरोडा टाकणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमाप्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे प्राप्त झाला होता.
मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन मा. श्री अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हे धोकादायक व्यक्ती असल्याने आरोपी नामे 1. मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफार बेग, राहणार- खडकपुरा, नांदेड, 2. आतिष जिवनसिंग ठाकु, राहणार असदवन, नांदेड 3. रबज्योतसिंघ ऊर्फ गब्या जसविंदरसिघ तीवाणा, राहणार- भगतसिंग रोड, इतवारा, नांदेड यांना एक वर्षाकरीता हर्सल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहे. नमुद आरोपीस हर्सल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील 11 गुन्हेगांराना MPDA कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या 14 झाली आहे.