नांदेड| पोलीस ठाणे लिंबगाव हद्यीमध्ये 33 के. व्ही. पॉवर स्टेशनच्या जवळ वाघी ते नाळेश्वर जाणाऱ्या रोडवर नाळेश्वर शिवारात दिनांक 30/11/2023 रोजी तिन अज्ञात आरोपीतांनी इसम नामे शिवप्रसाद बापुराव देशमुख रा. पिंपरण ता. पुर्णा जि. परभणी यास आडवुन त्याचेकडील एक सोन्याचे पान, चांदीची अंगठी व नगदी 9500/- रुपये जबरीने चोरी केले होते. त्यावरुन नमुद प्रकरणामध्ये पोलीस ठाणे लिंबगाव गुरनं. 162/2023 कलम 394, 34 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी स्थागुशाचे एक पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
दिनांक 01/12/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारे आरोपी हे लालवाडी ब्रिजचे जवळ, नांदेड येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे 1) शेख रिजवाल शेख अब्दुला वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. खडकपुरा नांदेड 2) शेख सलमान शेख निसार वय 19 वर्ष व्यवसाय बेकार रा. तेहरानगर, नांदेड 3) शेख साहेल अब्दुल सतार वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. तेहरानगर, नांदेड यांना दिनांक 01/12/2023 रोजी ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्हयातील सोन्याचे पान, चांदीची अंगठी व मोबाईल असा एकुण 29,905/- रुपयेचा मुद्येमाल काढुन दिल्याने सदर मुद्देमाल जप्त करुन त्यांना पोलीस ठाणे लिंबगाव गुरनं. 162/2023 कलम 394, 34 भा. द. वि. गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे लिंबगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, सपोउपनि/मारोती तेलंग, पोहेकॉ/ गुंडेराव करले, पोकों/देवा चव्हाण, मोतीराम पवार, तानाजी येळगे, गजानन बयनवाड, चालक गंगाधर घुगे स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.