हिंगोलीतील ओबीसीच्या एल्गार मोर्चासाठी हिमायतनगर तालुक्यातील हजारो समाज बांधव रवाना
त्या सभेने महाराष्ट्रातील शहरांसह ग्रामीण भागातील ओबीसी समाज एकवटला असल्याचे दिसत आहे. त्यानंतर दुसरी सभा हि हिंगोली येथे आज रविवारी दुपारी होणार असून, या सभेसाठी हिमायतनगर तालुक्यातील हजारो समाज बांधव रवाना झाले आहेत. यावेळी एकच पर्व…. ओबीसी सर्व…….जो ओबीसी कि बात करेगा….. वही देश पे राज करेगा…. अश्या घोषणा देऊन ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला.
ओबीसी समाज बांधवांकडुन जालनानंतर हिंगोलीतील रामलीला मैदानावर आज दि.26 नोव्हेंबर रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील सर्व पक्षीय मोठ्या नेते मंडळीसह समाज बांधव हिंगोलीमध्ये दाखल होणार आहेत. या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून नांदेड जिल्ह्यासह हदगाव – हिमायतनगर तालुक्यातील समाजबांधवानी आपापल्या भागात बैठका घेऊन हिंगोलीतील मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळी ९ वाजता हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघातून हजारो समाज बांधव हिंगोली येथील एल्गार मोर्चाला रवाना झाले आहेत. सुरुवातीला ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक करण्यात आला. यावेळी एकच पर्व…. ओबीसी सर्व… जो ओबीसी कि बात करेगा….. वही देश पे राज करेगा…. अश्या घोषणा देत ओबीसी समाज आरक्षण बचावासाठी हिंगोलीतील मोर्चाला हजारोच्या सांख्येने समाजबांधव निघाले आहेत.