नांदेडमनोरंजन

15 रोजी भोकरमध्ये दिवाळी पहाटचे आयोजन

भोकर, रवी कदम। येथील सेवा समर्पण परिवार च्या वतीने दिवाळी निमित्त १५ रोजी सकाळी साडेपाच वाजता इंडियन आयडॉल फेम कु. शिवानी स्वामी यांच्या मधुर वाणीत संगीत मैफलिची दिवाळी पहाट आयोजित करण्यात आली आहे.

शहरातील ऐतिहासिक कैलास गडावर दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी पहाट साजरी करण्यात येणार आहे. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या संगीत मैफिलीत, इंडियन आयडॉल फेम कु. शिवानी स्वामी, संगीतरत्न प्रा. शिवदास स्वामी, प्रा. राजेश ठाकरे, प्रा. प्रणव पडोळे, शिवकांता पडोळे यांच्या अभिजात संगीताचा सुरेल नजराणा सादर होणार आहे.

दत्त संस्थानचे महंत उत्तमबन महाराज, जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, श्री व सौ.रामेश्वर लांडगे ,निवेदक म्हणून सुरेश दंडवते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदरील कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सेवा समर्पण परिवार या सेवा भावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!