श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील ग्रामपंचायत गुंडवळ येथे जलजीवन मिशन अंर्तगत पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येत असून जि.प. प्राथमिक शाळा गुंडवळ तांडा च्या आवारात पाण्याचे टाके बांधकाम करण्याकरिता खड्ड्याचे खोदकाम करून ठेवले.

परंतु सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही दिवसापासून त्या ठीकांनी टाकीचे बांधकाम झाले नाही. सदर खड्ड्या लगत अंगणवाडी असून अंगणवाडी मधील बालके खड्यात पडून दुखापत किंवा एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सदर गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून काही जागरूक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास याबाबत कळविले असता ते जाणीवपूर्वक सदर ठिकाणचे टाकीचे काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत. करिता आपल्या स्तरावरून ग्रामपंचायत गुंडवळ यांना आदेशित करून मौजे गुंडवळ तांडा येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या जागेत अंगणवाडी लगत जल जीवन मिशन अंतर्गत कामाकरिता खोदलेला धोकादायक खड्डा बुजवून ग्रामपंचायत मालकीच्या इतर जागेत पाण्याचे टाके बांधकाम करण्याचे द्यावे अशी मागणी येथील अरविंद चव्हाण यांचे सह नागरिकांनी संबंधिताकडे निवेदनाद्वारे केली आहे.

