हिमायतनगर| शहरातील जुन्या दारलूम समोर रस्त्यावर सिमेंट रोड खचून मोठा खड्डा पडला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा खड्डा तसाच असून, एखादा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गंभीर बाबींकडे नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष केंद्रित करून तात्काळ खड्डा बुजवावा. अशी मागणी माजी नगरसेवक फेरोजखान पठाण यांनी केली आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्याची मोठी वाताहत झाली असून ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. पाणी पुरवठा योजनेचे काम चालू असून पाईपलाईन करण्यासाठी अंतर्गत रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात रस्त्याची मोठी वाताहत झालेली पहावयास मिळत असून जुनी दारलूम समोर सिमेंट रस्ता खचून भला मोठा खड्डा पडलेला असून पुर्ण रस्ताच खचला आहे.
सद्यस्थितीत मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिणा सुरू आहे. मुस्लिम बांधव मोठ्याप्रमाणात नमाज पडण्यासाठी या दारलूम, मस्जिद मध्ये येत आहेत. व तसेच हा रस्ता पोलीस ठाणे ते चौपाटी थेट असल्याने या रस्त्यावर नेहमी साठी मोठी नागरिकाची वर्दळ असते. ह्या ठिकाणी एखादा अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही. या गंभीर बाबींकडे नगर पंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष पुरवून हा जीवघेणा खड्डा तात्काळ बुजवून हा रस्ता रहदारी साठी मोकळा करून द्यावा. अशी मागणी काँग्रेस अल्प संखांक सेल चे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी केली आहे.