नांदेडमहाराष्ट्र

हिमायतनगर येथील महावितरण कंपनीच्या अभियंत्याची कार्यालयाला दांडी..!

हिमायतनगर| हिमायतनगर येथील विद्युत महावितरण कंपनी कार्यालयात उप अभियंता व शाखा अभियंता शहरी हे सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अभियंत्यांच्या गैरहजरीने विद्युत ग्राहकांच्या भावना आता संतप्त होवून मोठ्या प्रमाणात शिमगा केला जात आहे.

शहरात विद्युत महावितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय कार्यान्वित आहे. येथील तत्कालीन उप अभियंता नागेश लोणे यांची बदली झाल्यानंतर शहरी विभागाचे अभियंता श्री भडंगे यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यांनी तर मनमानीचा कळसच गाठला आहे. सतत गैरहजर राहत असल्याने आपल्या व्यथा कुणाकडे मांडाव्यात, हे समजत नाही. अश्या असंख्य स्वरूपाच्या तक्रारी आहेत. परंतू त्या तोंडी असल्यामुळे की काय? वरिष्ठ इकडे लक्ष द्यायला तयारच नाहीत.

सध्या तर रब्बी हंगामातील पिकांना पाणी फिरवण्याचे महत्वपूर्ण दिवस आहेत. अनेकांना विजेचे कनेक्शन आहेत, त्यांना वीजपुरवठा बरोबर मिळत नाही तर अनेकांना नवीन विज जोडणी घ्यायची आहेत. परंतू भडंगे कार्यालयात भेटतच नाहीत. भडंगे यांचा कार्यकाळ पहीले ही एकवेळेस वादग्रस्तच ठरला आहे. रेल्वेस्टेशनवर विज चोरीची घटना झाली. सबंध जिल्ह्यात हा वादग्रस्त विषय गाजला. परंतू मॅनेजमेंट मध्ये भडंगे ना पदवी असल्यामुळे की काय..? त्यांच्यावरील कारवाई अद्यापपर्यंत बासनात गुंडाळूनच आहे.

सध्याला शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात ही विज कमी अधिक दाबाची विज येत असल्याने घरगूती उपकरणं चालत नाहीत, जळून जात असल्याने नुकसानीला सामोरे जावं लागत आहे. विज बिल वेळेवर भरूनही विज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने ग्राहकांच्या भावना तिव्र स्वरूपाच्या झाल्या आहेत. आता कार्यकारी अभियंता भोकर व अधिक्षक अभियंता नांदेड यांनी हिमायतनगर शहराकडे जातीने लक्ष पुरवून येथील विज वितरण कार्यालयाची विस्कटलेली घडी निट करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या तत्कालीन उप अभियंता व शहरी श्री भडंगे यांच्यावर कारवाईचा बडगा उभारावा. अशी मागणी शहरवाशीय नागरिकांतून पुढे आली आहे.

नागरिक कामासाठी अभियंता भडांगे याना फोन लावतात मात्र हे महाशय फोनचा उचलत नाहीत, त्यामुळे नागरिक शेतकरी व सामान्य वीज ग्राहक वैतागले आहते. शहरात अनेक ठिकाणी घराची बांधकामे चालू आहेत. अंक घराणं विजेच्या तारा लागण्याची शक्यता आहे. याबाबत अनेकवेळा तारा दूर करा किंवा खांब्याला ब्राईकेत लहून तारा पासून सुरक्षा द्या अशी मागणी केली असता देखील केवळ आपली मर्जी सांभाळल्या जात नाही त्यामुळे त्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. जिथे मलिदा मिळतो ते काम रतरूं करून टाकले जात आहे. हिमायतनगर शहर व तालुक्यात असे बरीचशी उदाहाने पुराव्यासह आहेत ज्या ठिकाणची कोणतेही प्रोसेस न करता परस्पर डीप्यासुद्धा जाग्यावरून हलविण्यात आल्या आहेत. अश्या एक या अनेक त्यांच्या तक्रारी आहेत. त्या अनसूहनगाणे चौकशी केल्यास मोठा गैरव्यवहार उघडकीस येईल यात शंका नाही.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!