नांदेड। हिंगोली गेट परिसरातील फटाका मैदानामध्ये दिनांक 05/01/2024 रोजी रात्री विकास यशवंत राऊत रा. सिध्देश्वर वार्ड, बोरबन, गणपती मंदिर जवळ, उमरखेड जि. यवतमाळ याचेवर अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने वार करुन, त्याचा निघून खुन केला होता. सदर प्रकरणी पो. स्टे. वजिराबाद, नांदेड येथे गु.र.नं. 11/2024 कलम 302 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय, स्था.गु.शा., नांदेड यांनी पथके तयार करुन आरोपीतांना अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
दिनांक 23/01/2024 रोजी स्था. गू.शा. चे पथकातील पोउपनि. श्री. ए. एम. बिचेवार व श्री. डी. एन. काळे त्यांचे सोबत असलेल्या अंमलदारासह नांदेड शहरात आरोपी शोध कामी पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशईत इसम नामे भारतसिंघ पि. धारासिंघ बावरी वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी रा. भावेश्वरनगर, चौफाळा, मरघाट, नांदेड ह. मु. इंदिरानगर, झोपडपट्रटी, कळमनुरी ता. कळमनुरी जि. हिंगोली हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने व त्याचा एक साथीदार या दोघांनी मिळुन, पोलीस ठाणे वजिराबाद हद्यीत दिनांक 05.01.2024 रोजी रात्रीचे वेळी फटाका मैदान, हिंगोली गेट, नांदेड येथे विकास यशवंत राऊत याचा खुन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर मयताचा मोबाईल हा वाळुज जि. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चालु झाल्याबाबत तांत्रीक पुरावा मिळाल्याने त्या ठिकाणाहुन आरोपी भारतसिंघ याचा मित्र राहुल मोटे याचेकडुन मयताचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. यातील मयत हा कामासाठी वाळुज या ठिकाणी राहत होता व मोबाईल वाळुज येथे मिळुन आल्याने सदर घटनेबाबत काही पुर्व पार्श्वभुमी आहे काय ? याबाबत अधिक तपास सुरु आहे. यातील आरोपी नामे
भारतसिंघ पि. धारासिंघ बावरी वय 35 वर्षे व्यवसाय मजुरी रा. भावेश्वरनगर, चौफाळा, मरघाट, नांदेड ह. मु. इंदिरानगर, झोपडपट्रटी, कळमनुरी ता. कळमनुरी जि. हिंगोली यास पो. स्टे. वजिराबाद, नांदेड गु.र.नं. 11/2024 कलम 302 भा.दं. वि. मध्ये पुढील तपास कामी देण्यात आले आहे. तसेच दिनांक 05.01.2024 रोजी रात्री फिर्यादी अखिलेशकुमार दुबे यांनी त्यांचा मोबाईल व पैसे जबरीने काढुन घेतले बाबत दिलेल्या तक्रारीवरुन पो. स्टे. वजिराबाद येथे गु.र.नं. 33/2024 कलम 392, 34 भा.दं.वि. प्रमाणे दाखल आहे.
त्या गुन्हयाचे अनुषंगाने ताब्यात घेतलेला संशईत इमस नामे जसविंदरसिंघ ऊर्फ जस्सी पि. स्वरुपसिंघ रामगडीया वय 42 वर्षे व्यवसाय स्मशानघाट नगिनाघाट काम रा. स्मशानघाट, नांदेड मुळ गाव तिलकनगर, विष्णुगार्डन, नई दिल्ली यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असुन, सदरचा गुन्हा हा त्याने व त्याचा साथीदार नामे भारतसिंघ पि. धारासिंघ बावरी व इतर एक साथीदार यांनी मिळुन केल्याचे सांगत आहे.
वर दोन्ही गुन्हयातील मोबाईल हे वाळुज येथील राहुल रवि मोटे याचेकडे मिळुन आले. सदरचे दोन्ही मोबाईल किंमती रु. 17000/- चे त्याचेकडुन जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपी नामे जसविंदरसिंघ ऊर्फ जस्सी पि. स्वरुपसिंघ रामगडीया वय 42 वर्षे व्यवसाय स्मशानघाट नगिनाघाट काम रा. स्मशानघाट, नांदेड मुळ गाव तिलकनगर, विष्णुगार्डन, नई दिल्ली यास पो. स्टे. वजिराबाद गु.र.नं. 33/2024 कलम 392, 34 भा.दं. वि. मध्ये पुढील तपास कामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक श्री. माने, पोलीस उप निरीक्षक, श्री. आनंद बिचेवार, श्री. दत्तात्रय काळे, श्री. आशिष बोराटे, श्री. गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार गुंडेराव करले, सुरेश घुगे, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, किशन मुळे, गजानन बयनवाड, तानाजी येळगे, मोतीराम पवार, ज्वालासिंघ बावरी, राजु सिटीकर, दिपक ओढणे व चालक मारोती मुंढे, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.