नांदेड| सीटू कामगार संघटनेने नांदेड शहरातील पूरग्रस्तांचा लढा मागील पाच महिन्यापासून अखंड लढला आहे. आतापर्यंत ७८ दिवस विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.२९ डिसेंबरला दुसरी त्रुटीतील पूरग्रस्तांची यादी महापालिकेच्या आपत्ती विभागाने तहसील कार्यालयास पाठविली आहे.ती यादी प्रसिद्ध करणे आणि अनुदान बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी ही तहसील प्रशासनाची आहे.यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या यादीतील अनेक नावे बोगस आणि चुकीची असल्याचा आरोप अनेकांनी अनेक वेळा केला आहे.
काही मनपाच्या वसुली लिपिकांनी आपल्या रक्ताच्या नातेवाईकांची नावे पात्र यादीत टाकून चुकीचा पंचनामा करून शासनाची फसवणूक करून लाभ घेतला असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तलाठी आणि वसुली लिपिकांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता करून साधारणतः सहा कोटी रुपयांचा अपहार पूरग्रस्तांच्या अनुदानात केला आहे.
हा पूरग्रस्तांच्या निधीचा घोटाळा दाबून टाकण्यासाठी काही लोक तळमलीने प्रयत्नशील असून सीटू प्रणित मजदूर युनियनच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्यासाठी काही मन दुखगावलेली राजकीय मंडळी सक्रिय झाली आहे. कायदेशीर आवाहन करून संकलित केलेल्या लढा निधी वरून धमक्या दिल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने विचार केला तर सीटू च्या वतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करून लढा निधी परत घेऊन जाण्याचे आवाहन २० दिवसापूर्वी प्रसिद्धी माध्यमातून केले होते. परंतु कोणी पुढे आले नाही. आणि ७९ दिवस सातत्याने आंदोलन चाहळविण्यासाठी लाखाच्यावर खर्च झालेला आहे.
१००-२०० रुपयासाठी राजकारण करून खचीकरण करणारे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच सहा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढतील असा विश्वास सीटूच्या कार्यकर्त्यांनी महिनाभरपूर्वी व्यक्त केला होता. कारण या सर्व प्रकरणाची सिआयडी चॊकशी करावी व दोषी विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केलीली आहे. मंजूर रक्कम पूरग्रस्तांच्या बँक खात्यात का जमा केली जात नाही? हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शंका निर्माण होत आहेत.
महापालिकेच्या वतीने पाठविलेली पूरग्रस्तांची यादी प्रसिद्ध करावी व खऱ्या पूरग्रस्तांना अनुदान देण्यात यावे ही मागणी घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी – लेनिनवादी) डेमोक्रासी चे सचिव कॉ. दिगंबर घायाळे हे दि.१ जानेवारी सकाळी ११:०० वाजता पासून तहसील कार्यालय, नांदेड समोर उपोषणास बसले असता नांदेडचे प्रभारी तहसीलदार श्री स्वप्नील दिगलवार यांनी शिष्टमंडळा सोबत चर्चा करून उपोषणार्थी व कार्यकर्त्यांचे समाधान केले आणि पुढील चार दिवसात राहिलेल्या पूरग्रस्तांची अनुदान रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करतो असे आश्वासन दिले.
कर्तव्यदक्ष अधिकारी आणि तरुण तडफदार असलेल्या स्वप्नील दिगलवार तहसीलदार नांदेड यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन माले च्या कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि उपोषण स्थगित केले.त्यांच्या सोबत अव्वल कारकून देविदास जाधव आणि आपत्ती विभागातील कर्मचारी रवी दोन्तेवार हे उपस्थित होते. एकंदरीतच राहिलेल्या पूरग्रस्तांना पुढील आठवड्यात अनुदान मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.