क्राईमनांदेड

जबरी चोरीचे गुन्हयातील फरार आरोपीस 20000/- रुपयाचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

नांदेड| पोलीस ठाणे लिंबगाव हद्यीमध्ये पिंपळगाव (कोरका) जाणारे रोडवर दिनांक 05/09/2023 रोजी दोन अज्ञात आरोपीतांनी इसम नामे माधव कामाजी दुड्डे रा. चिकणा ता धर्माबाद यास आडवुन जबरीने चोरी केली होती. त्यावरुन नमुद प्रकरणामध्ये पोलीस ठाणे लिंबगाव गुरनं. 123/2023 कलम 394, 34 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी स्थागुशाचे एक पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

दिनांक 23/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद आरोपी हा मामा चौक, नांदेड येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे दिपक ऊर्फ छक्या पिता विनोद भोकरे वय 24 वर्ष रा. जुना कौठा रविनगर, नांदेड यास आज रोजी ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी व त्याचा दुसरा साथीदार नामे आवेस ऊर्फ अब्बु शुटर शेख यांनी मिळुन पोलीस ठाणे लिंबगाव गुरनं. 123/2023 कलम 394, 34 भा. द. वि. हा गुन्हा केला असल्याचे सांगीतले असुन नमुद गुन्हयातील गेले मालापैकी 20,000/- रुपये काढुन दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपीस पोलीस ठाणे लिंबगाव यांचे ताब्यात पुढील

तपासकामी देण्यात आले आहे. सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, सपोउपनि/माधव केंद्रे, पोहेकॉ/ गुंडेराव करले, पोकॉ/ देवा चव्हाण, मारोती मोरे, चालक हेमंत बिचकेवार स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!