हिमायतनगरातील बुध्द मुर्ती प्रतिष्ठापना प्रथम वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी होणार साजरा
हिमायतनगर| शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या नालंदा बुध्द विहार येथे दिनांक ०३ जून २०२४ रोज सोमवारी बुध्द मुर्ती प्रतिष्ठापना प्रथम वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पाच सत्रात कार्यक्रम साजरे होणार आहेत. या कार्यक्रमास परिसरातील सर्व बौद्ध उपासक/उपासिका यांनी उपस्थित होऊन प्रथम वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय बौध्द महासभा लुका शाखा हिमायतनगर च्या वतीने करण्यात आले आहे.
परिसरातील सर्व बौध्द उपासक उपासिका यांना कळविण्यात येते की, दिनांक ०३ जून २०२४ रोजी नालंदा बुध्द विहार तथा बुध्द मुती प्रतिष्वापनेस वर्षपुर्ती होत आहे. त्यानिमित्ताने बुध्दमुर्ती प्रतिष्ठापनेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्रात सकाळी ठिक ९:१५ वाजता धम्म ध्वजारोहन सोहळा तथा १० दिवसिय महिला शिबिराचा समारोप, व्दितीय सत्रात सकाळी ठिक १०:३० ते दु. १२:३० वाजता नालंदा बुध्द विहार निर्मितीमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व बौध्द उपासक उपासिका यांचे नालंदा बुध्द विहार बांधकाम समिती कडून आभार सोहळा.
तिसऱ्या सत्रात दुपारी ठिक १२:३० ते दु. ०३:०० वाजता पुज्य भंदत धम्मसेवक जी महाथेरो मुळावा आणि भंदत विनयबोधीप्रिय महाथेरो, नांदेड यांची धम्मदेसना संपन्न होईल. चौथ्या सत्रात दुपारी ठिक ०३:०० ते ०६.०० वाजता भोजनदान पाचव्या सत्रात सायंकाळी ठिक ७ वाजयंता विद्रोही प्रबोधनकार कैलासदादा राऊत, हदगांव यांच्या भिमगितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. यावेळी परिसरातील सर्व बौद्ध उपासक/उपासिका यांनी उपस्थित होऊन कार्यक्रमात सहभागी व्हावा असे आवाहन भारतीय बौध्द महासभा लुका शाखा हिमायतनगर व समस्त बौध्द उपासक तथा शासिका हिमायतनगर जि. नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.