क्राईमनांदेड

पो.स्टे शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कार्यवाही आरोपीकडुन एक अग्नीशस्त्र ( पिस्तुल) व एक जिवंत काडतूस जप्त

नांदेड| दिनांक.27/10/2023 रोजी दुर्गादेवि विसर्जन अनुशंगाने सहापोलीस निरीक्षक आश्रूबा घाटे सर यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमलदार यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करणेकरीता पोलीस स्टेशन शिवाजीनगर हददीत दुर्गादेवी स्थळी भेटी व पेट्रोलींग करत असतांना गुन्हे शोध पथकातील पथक प्रमुख मिलींद सोनकांबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, रोड नंबर 26 येथील रमामाता आंबेडकर नगर पीटीजवळ एक ईसम पिस्तुल सोबत बाळगुन फिरत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.

यावरुन सदर माहीती ही वरिष्ठांना देवुन गुन्हे शोध पथकातील पथक प्रमुख मिलींद सोनकांबळे व पथकाती कर्मचारी असे रोड नंबर 26 येथील रमामाता आंबेडकर नगर पीटीजवळ सापळा लावुन आरोपी नामे सागर उर्फ मुन्ना शामसींग परमार वय 26 वर्ष, व्यवसाय- अॅटो चालक रा. सखोजी नगर नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचे ताव्यातुन 1) एक लोखंडी गावठी बनावटी असलेला अग्णिशस्त्र ( पिस्तुल ) काळ्या कलरची मुठ असलेली ज्यात एक मॅग्जीन असलेली जु.वा. कि. अं 20,000/- रुपये व 2) एक जिवंत काडतुस जु.वा.कि.अं. 2000 /- रुपये असा एकुण 22,000/- रुपये. चा मुद्देमाल जप्त करुन गुरनं 350/23 कलम 3/25 आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक भोकर डॉ. श्री खंडेराव धरणे तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.सुरज गुरव, सहापोलीस निरीक्षक आश्रुबा घाटे पोलीस स्टेशन शिवाजीनगर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक मिलींद सोनकांबळे, व पो.हे.कॉ/835 रविशंकर बामणे, पोकॉ/ 3011 देवसिंग सिंगल, पोकॉ/3099 शेख अझहर, पोकों 3218 लिंबाजी राठोड, पोकॉ/ 1466 अंकुश लंगोटे, पोकॉ 3147 दत्ता वडजे यांनी पार पाडली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!