हिमायतनगर, परमेश्वर काळे| हिमायतनगर वाढोणा शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखपदी येथील कट्टर शिवसैनिक रामभाऊ ठाकरे, शहर प्रमुखपदी गजानन हरडपकर यांची निवड दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आली आहे. त्यांची निवड झाल्याची माहिती मिळताच रामभाऊ ठाकरे यांच्या चाहत्यां कार्यकर्त्यांनी श्री परमेश्वर मंदिर मैदानात फटाक्याची आतिषबाजी करत भव्य दिव्य अश्या पद्धतीने स्वागत केले आहे.
लवकरच लोकसभा- विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकारी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. हिमायतनगर वाढोणा तालुका प्रमुखपदी येथील कट्टर शिवसैनिक रामभाऊ ठाकरे यांची पुनश्च निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड झाल्याची माहिती मिळताच रामभाऊ ठाकरे यांच्या चाहत्यां कार्यकर्त्यांनी हिमायतनगर वाढवण्याचे ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिर मैदानात फटाक्याची आतिषबाजी करत भव्य दिव्य अश्या पद्धतीने स्वागत केले आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्य करणाऱ्या एका सच्च्या शिवसैनिकांची तालुका प्रमुखपदी निवड केल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली आहे.
तसेच शहराध्यक्षपदी गजानन हरडपकर यांची निवड झाल्याबद्दल स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत खा.हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार, विजय वळसे, रमेश गुड्डेटवार, भाऊराव वानखेडे, साहेबराव चव्हाण आदींसह हजारो शिवसैनिक कार्यकर्त्यांनी उपस्थित होऊन रामभाऊ ठाकरे व गजानन हरडपकर याना शुभेच्छा दिल्या. यावेळी रामभाऊ ठाकरे तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है… च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच शहरातील ठीक ठिकाणच्या चौकात देखील तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे यांचं स्वागत करून शुभेच्या देण्यात आल्या. त्यानंतर रामभाऊ ठाकरे यांनी येथील श्री परमेश्वर मंदिरात जाऊन शरचे दर्शन घेऊन नारळ फोडून आशीर्वाद भेटले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, खासदार हेमंतभाऊ पाटील आणि जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांचे आभार मानून येणाऱ्या काळात संपूर्ण हिमायतनगर तालुका पिंजून काढून शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.