नांदेड/किनवट। किनवट शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी अगदी 20 फुटांवरच असलेल्या जयस्वाल वाईन मार्ट मुळे दारुड्यांचा हैदोस वाढला असून ऐन दिवाळी सणात महिलांची खरेदी साठी लगबग सुरू झालेली असताना हे दारुडे वाईन मार्ट मधून दारू घेऊन तिथेच दुकान बाहेर दारू पिऊन चौकात आणि परिसरात धिंगाणा घालताना दिसतं आहेत ज्यामुळे महिलांना,मुलींना आणि लहान मुलांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या दुकानाचा परवाना रद्द करण्याचा मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी आवाज उठवला असून लवकरच मा.अधीक्षक साहेब, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय,नांदेड समोर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी बोलून दाखविला आहे.
कोणत्याही महापुरुषांचा पुतळ्या जवळ दारूचे दुकान नको असे शासन म्हणते पणं किनवट तालुका याला अपवाद आहे.खुद्द महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ साधारणत फक्तं 20 फुटांवर वाईन मार्ट आणि एक बार आहे.वाईन मार्ट मधून दारू घेऊन तिथेच दुकानाबाहेर दारू पिणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. एकतर त्या दुकानातून दारू घेऊन जाणारा कोण याची नोंद ठेवली जात नाही.कोणीही यावे आणि टिकली मारून जावे या म्हणी प्रमाणे कोणीही येतो आणि दारू खुले आम् घेवून जातो.
दारू नेणाऱ्याकडे दारू पिण्याचा आणि सोबत नेण्याचा परवाना आहे किंवा नाही हे ही बघितले जात नाही.अगदी 18 वर्ष खालील मुलेही खले आम् दारू घेवून जाताना दिसतं आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तपासणी साठी येतात तेव्हा दिवस असतो त्यामुळे त्यांना सायंकाळी पाच ते रात्री दुकान बंद करे पर्यंत कोणता सावळा गोंधळ चालतो हे काय माहिती.!
सदरील प्रकरणी मा.निरीक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क कार्यालय किनवट आणि दुय्यम निरीक्षक साहेब हे काय कारवाई करतात हे बघण्या सारखे राहिलं. जर त्यांनीही फक्तं बघण्याची भूमिका घेतली तर दिनांक 20/11/2023 पासून मा.अधीक्षक साहेब, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय नांदेड समोर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.