नांदेड| श्रीपतराव भोसले हायस्कुल उस्मानाबाद येथे घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत कु. पलाशा संजय नलावडे (6th class) हिने पहिला नंबार मिळविला आहे. याबद्दल सर्व स्तरातून पलाशाच्या रांगोळी कलेचे कौतुक केले जात आहे.
कु. पलाशाने रांगोळीतून ज्ञान ज्योती सावित्री फुले यांची सुंदर प्रतिमा साकारली आहे. ही रांगोळी काढून तीने ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले याना त्रीवार अभिवादन केले आहे. कु. पलाशा संजय नलावडे ही डॉ. संजय आणि सौ ज्योती नलावडे यांची कन्या आहे.
त्या लहानश्या सावित्रीने रांगोळीतुन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा साकारल्याबद्दल या छोटयाश्या सावित्रीचे मानव अधिकार भष्ट्राचार निर्मुलन संस्था यांच्या कार्यकारी अध्यक्षा मुक्ता पेटकर, अखिल भारतीय फामासिष्ट असोसिएनच्या उपअध्यक्षा कल्याणी मेडम वाघ, एन आर देशमुख, एक्सझिकेटीव्ह इंजिनियर उस्मानाबाद, जेष्ट समाज सेवीका वर्षाताई जमदाडे यांनी कु. पलाशा हिचे कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा व आर्शिवाद दिले आहेत.